फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर लगबगीनं तिनं गाठलं हॉटेल, बेशुध्द होईपर्यंत युवकानं केलं तिच्यासोबत ‘हे’ काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील अरॉसिटीमधील एका हॉटेलमध्ये मुलीला बेदम मारहाण करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून संबंधित तरुणावर गुन्हा नोंदविला असून त्याचा तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील या हॉटेलमध्ये 6 ऑक्टोबर रोजी एका एनआरआय तरुणाने या तरुणीला बेदम मारहाण करण्याची घटना घडली आहे. बेशुद्ध पडेपर्यंत या तरुणीला मारहाण झाल्याचा आरोप तिने केला आहे. तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, तरुण अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये रहात असून त्यांची ओळख फेसबुकवर झाली होती.

काही दिवस दिवस गप्पा मारल्यानंतर दोघांनी एकमेकांना भेटण्याचे ठरवले. यासाठी तरुण न्यूयॉर्कवरून दिल्लीमध्ये आला होता. त्यानंतर 6 तारखेला हि तरुणी त्याला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेली असता काही गोष्टींवरून त्याने तिला बेदम मारहाण केली. तसेच तिला बेशुद्धावस्थेत सोडून पळून गेला. दरम्यान, पोलिसांनी या मुलीच्या जबाबावरून गुन्हा नोंदविला असून या तरुणाचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like