‘त्या’ आश्रम शाळेचे भवितव्य ठरणार पुण्यात

कुरळप : पोलीसनामा ऑनलाईन

सांगली जिल्ह्यातील कुरपळ येथील मिनाई आश्रमशाळेतील मुलींच्या लैंगिक शोषणाची घटना उघकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर आश्रमशाळेची मान्यता का रद्द करु नये अशी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. भटक्या जाती-जमाती विमुक्त मागासवर्ग संचालनालयाच्या पुणे कार्यालयाने ही नोटीस पाठवली आहे. शनिवारी (दि. ६)  पुणे येथे  याची सुनावणी होणार आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1e951aed-c71c-11e8-980f-89a02a5ffe5f’]

मान्यता रद्दच्या नोटीसीमुळे शाळेचे व शिक्षकांचे भवितव्य अधांतरी झाले आहे. आश्रमशाळेचा संस्थापक सचिव अरविंद पवार हा शाळेतील मुलींच्या लैंगिक शोषणप्रकणी पोलिस कोठडीत आहे. त्याच्या या कृत्यांमध्ये संस्थेतील शिक्षक किंवा कर्मचारी सहभागी आहेत का, याची  चौकशी तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर करीत आहेत.

[amazon_link asins=’B01D05DRXS,B015Z7ZQJC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6c42aa95-c71c-11e8-883c-5bc458c58da1′]

गेल्या आठ दिवसांपासून शाळेच्या भवितव्याविषयी अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. यामध्ये शाळा सुरू राहणार की बंद पडणार याबद्दल नेमकेपणाने कुणीच बोलत नाही. आमदार शिवाजीराव नाईक व माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी शिक्षक, शिक्षकांचे नुकसान होणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्या दिवशीच संचालक कार्यालयाने शाळा मान्यता रद्द का करू नये, अशी नोटीस प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापकांना दिली आहे. याविषयी खुलासा करण्यासाठी दोन्ही मुख्याध्यापकांना गुरुवारी पुणे येथे बोलावण्यात आले आहे. त्या ठिकाणी अंतिम फैसला होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

निमगांव केतकी खून प्रकरणी एका आरोपीला अटक

दरम्यान  शाळेची मान्यता रद्दबाबतचा अहवाल समाजकल्याण विभागाकडून पाठविण्यात आला आहे, असे समजते. सध्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे काय होणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.गांधी जयंतीदिनी  विद्यार्थी-पालकांची सभा झाली. त्यावेळी  विद्यार्थी-विद्यार्थीनींनी शाळा बंद पडू नये म्हणून मते व्यक्त केली. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी माजी विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेविषयी बोलताना  अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले, की  कोणत्याही प्रकारे शाळेतील शिक्षकांचे नुकसान शासनाला करता येणार नाही. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांबरोबर पत्रव्यवहार करीन.