India China Tension : पाठीमागुन वार करण्याचा खेळ आता आणखी नाही… भारतीय लष्करानं चीनी सैनिकांना दिला शेवटचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत – चीनमधील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये कमांडर लेव्हल चर्चा सुरू आहे. ही दोन्ही देशांमधील कमांडर लेव्हलची सहाव्या टप्प्यातील ही बैठक आहे. या बैठकीसाठी भारताने नवी स्ट्रॅटजी सुद्धा तयार केली होती. यावेळी भारताच्या डेलिगेशनमध्ये 12 अधिकार्‍यांची टीम आहे. ज्यामध्ये एक मुत्सद्दीसुद्धा आहे.

भारताकडून मुख्य रोलमध्ये आहेत लेफ्टनन्ट जनरल पी. के. मेनन आणि दुसरे लेफ्टनन्ट जनरल आहेत हरिंदर सिंह. ही पहिली वेळ आहे, ज्यामध्ये भारताकडून दोन लेफ्टनन्ट जनरल कमांडर स्तरावरील चर्चेत सहभागी होत आहेत. लेफ्टनन्ट जनरल मेनन आणि चीनी जनरल ली शी झोंग यांच्यात चांगला सैन्य ताळमेळ राहिला आहे.

लेफ्टनन्ट जनरल मेनन शिख रेजिमेंटचे आहेत आणि मोठा कालावधी एलएसीवर त्यांनी घालवला आहे. 2018 मध्ये दोन्ही जनरल प्रथमच सोबत दिसले होते. दोघांमधील ताळमेळामुळेच 1990 च्यानंतर 2018 मध्ये मेजर जनरल लेव्हलच्या ऑफिसरने बीपीएम म्हणजे बॉर्डर पर्सनल मीटिंगमध्ये भाग घेतला होता. जी अरुणाचल प्रदेशात झाली होती आणि आता चीनच्या मॉल्डोमध्ये दोघांमध्ये मागील 10 तासांपासून चर्चा सुरू आहे.

मात्र, चीनची कोणती इच्छा आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. एकीकडे चीन चर्चेसाठी धडपड करतो तर दुसरीकडे दररोज दारूगोळ्याचे व्हिडिओ जारी करत आहे. चीनने युद्ध सरावाचा एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, भारताशी युद्ध करण्यासाठी चीन कशाप्रकारे तयार आहे.

हा व्हिडिओ चीनचा प्रोपगंडा मीडिया ग्लोबल टाइम्सने जारी केला आहे आणि लिहिले आहे की, जंगल आणि वाळवंटात पीपल्स लिब्रेशन आर्मीने ड्रिल केली. चीनच्या या घबराटीचे ताजे कारण आहे राफेलने घेतलेले उड्डाण. काही तासांपूर्वी राफेलने एलएसीवर उड्डाण घेतले होते. ज्यामुळे जिनपिंग यांच्या गोठात खळबळ उडाली आहे.

चीनी लष्कराला लास्ट वॉर्निंग
ही एलएसीवरील भारताची फायनल रिहर्सल आहे. हा चीनला शेवटचा इशारा आहे. राफेलच्या गर्जनेमुळे चीनला चांगलीच धडकी भरली आहे.

रविवारी रात्री लडाखच्या आसमंतात राफेलचा आवाज घुमला. एलएसीवर हिमालयाच्या पर्वतांवर राफेलने नाईट पेट्रोलिंग केली, तेव्हा युद्ध सराव करणार्‍या चीनच्या गोठात खळबळ उडाली आहे. आता पाठीत वार करण्याचा खेळ पुरे झाला, असा इशाराच भारताने यामध्यमातून दिला आहे.