बनावट आधारकार्ड तयार करणारी टोळी गजाआड

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन-

बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने आधार कार्ड बनवून देणाऱ्या टोळीला सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली आहे. नेपाळी व्यक्तीला आधार कार्ड बनवून दिल्याप्रकरणी सदरची कारवाई करण्यात आली असून, नवीनचंद्र पांचाळ, तपेंद्र मोती आऊजी, संजय शंभू कानडे, इम्रान अहमद सुल्तान अहमद शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
[amazon_link asins=’B00SAX9X6G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c9e71023-a157-11e8-ba64-973d218ffd4c’]

चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सांताक्रूझ परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेपाळी व्यक्तीकडे बनावट कागदपात्रांच्या आधारे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आणि चार आरोपींना जेरबंद केले आहे. गुन्हे शाखेच्या परिमंडळ- ९ चे उपायुक्त परमजितसिंग दहिया, सहायक आयुक्त दत्तात्रय भरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला आहे.

इतर बातम्या

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन 

पुण्यातील व्यक्ती आणि संस्थांशी अटलजींचे घनिष्ट संबंध 

अटल बिहारी वाजपेयी यांच्या विषयी सर्व माहिती