दौंड तालुक्यात २ रिव्हॉल्वरसह दरोडेखोरांची टोळी जेरबंद,

दौंड – पोलीसनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील केडगाव-सुपा या रोडवर असणाऱ्या पडवी गावाजवळ दरोडा टाकण्याच्या उद्देशाने उभे असलेल्या पाच दरोडेखोरांची यवत पोलिसांशी झटपट होऊन यवत पोलिसांनी दोन दरोडेखोरांना त्यांनी सोबत आणलेला शस्त्र साठ्यासह ताब्यात घेतले असून या झटापटीत यवतचे दोन पोलीस जखमी झाले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3d104e80-c6e1-11e8-9ed9-0dccdd032af5′]

यावेळी पाच दरोडेखोरांसह झालेल्या झटापटीनंतर तीन दरोडेखोर पळून जाण्याचा यशस्वी ठरले आहेत. यवत पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २ ऑक्टोबर रोजी रात्री ८ च्या सुमारास केडगाव-सुपा रोडवर असणाऱ्या पडवी गावाजवळ पाचजण दरोड्याचा उद्देशाने दबाधरून बसले असल्याची माहिती यवतचे सहा.पोलीस निरीक्षक विनायक देवकर यांना पेट्रोलिंग करताना  मिळाली यावेळी देवकर यांनी पोलीस नाईक गणेश पोटे व पो.कॉ. विनोद रासकर यांच्यासह अन्य पोलीस स्टाफ सोबत घेऊन सदर आरोपींना सुपे घाटाच्या खाली पडवी हद्दीमध्ये घेरताच दरोड्याचा उद्देशाने दबाधरून बसलेल्या  पाचजणांनी पोलिसांना धक्काबुक्की व किरकोळ जखमी करून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

[amazon_link asins=’B01LWYDEQ7,B01GNX31US’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8b49065e-c6e1-11e8-8f4d-659519c7a7f4′]

यावेळी  पो.ना.पोटे व पो.कॉ.रासकर यांनी आरोपींचा पाठलाग करून त्यांना पकडले. यावेळी पकडलेल्या आरोपींची नावे  सुरेश बापूराव खोमणे, वय – ३५ वर्षे, रा.कोऱ्हाळे,  ता.बारामती जि.पुणे. व अमोल विलास खरात वय २४ रा. दहिवडी ता माण जि सातारा. अशी असल्याचे समजले तर त्यांचे अन्य तीन साथीदार हे मोटार सायकलींवर फरार झाले.

तानाजी चित्रपटात ‘हा’ अभिनेता बनणार शिवाजी महाराज

वरील दोन्ही आरोपींकडे दोन गावठी कट्टे वीस गोळ्या म्हणजेच राउंड दोन मोटर सायकल तीन मोबाईल एक लोखंडी टॉमी एक लाकडी दांडके मिर्चीपुड असे दरोडा घालण्याचे साहित्य जवळ मिळून आले वरील सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक विनायक देवकर करीत आहेत.