गॅंगस्टर दाऊद इब्राहिम चा  शार्प शूटर नईम खान ठाणे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे : पोलीसनामा आॅनलाईन

गॅंगस्टर दाऊद इब्राहिम चा शार्प शूटर नईन खान याच्या गोरेगाव येथील बांगुर नगरातील घरातून एके 56 रायफलसह मोठा शस्त्रसाठा ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने जप्त केला होता.  जप्त केलेला शस्त्रसाठा नेमका कोठून आला आणि कोणत्या हेतूसाठी तो आणला होता या दिशेने आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’040774f3-8749-11e8-88f6-6342d49f3669′]

या संपूर्ण प्रकरणाचा अधिक सखोल तपास करण्यासाठी नईम खानचा ताबा आपल्याला मिळावा यासाठी ठाणे पोलिसांनी कोर्टात धाव घेतली होती. अखेर शुक्रवारी मुंबईच्या विशेष मोक्का न्यायालयाने नईम खानचा ताबा ठाणे पोलिसांना दिला. शनिवारपासून नईमची चौकशी सुरु करण्यात येणार असून त्याच्या चौकशीतून एके 56 रायफलशी संबंधित अनेक गुप्त गोष्टी समोर येतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, डी गॅंगचा कुख्यात शार्प शूटर नईम फईम खान याच्या मुंबईतील बांगुर नगरमधील घरातून एके 56 रायफल, 3 मॅगझीन, 95 जिवंत काडतुसे, 2 नाईन एमएम पिस्तूल आणि 13 जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा ठाणे खंडणी विरोधी पथकाने मागील आठवड्यात हस्तगत केला होता.
[amazon_link asins=’B077PWK5BT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’08bc723a-8749-11e8-9f12-25313ad5c564′]

सध्या नईम खान  एका खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये असून पोलिसांनी त्याची पत्नी यास्मिन नईम खान हिला अटक केली होती. जप्त करण्यात आलेली रायफल आणि इतर शस्त्रसाठा माझ्या लग्नाच्या आधीपासून घरात असून, मला याबाबत काहीच माहिती नाही असा जबाब नईम खानच्या पत्नीने दिला आहे. दरम्यान ठाणे खंडणी विरोधी पथकाने नईम यास मुंबईच्या विशेष मोक्का न्यायालयातून ताब्यात घेतल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली.