अंगावर पेट्रोल ओतुन तरुणीने केली आत्महत्या…

नागपुर : पोलीसनामा – किरकोळ वादाच्या कारणावरुन एका तरुणीने स्वताःच्या अंगावर पेट्रोल ओतुन जाळुन घेऊन आत्महत्या केली .हि घटना रविवारी दुपारी १.३० च्या सुमारास बोखारा परिसरात घडली. मृत तरुणीचे नाव राखी सुरेश आवळे असे आहे. राखीचे वय २७ वर्ष असून ती बोखारा येथील रहिवासी आहे.

राखीचे आई वडिल मोलमजुरी करतात,तिला एक भाऊ आहे,तो देखील रोजंदारीवर मिळेल ते काम करतो . राखी तिच्या आई वडिलांकडे तिन वर्षापासून सोबत राहत होती . राखीने काही वर्षापुर्वी प्रेमविवाह केला होता . परंतु,पती पत्नीत मतभेद झाल्यामुळे दोघांनी घटस्फोट घेतला.

दुपारी १ : ३० च्या सुमारास तिच्यात आणि आईत काही झु्ल्लक कारणावरुन वाद झाला. वाद संपल्या नंतर तिची आई शेजारी गेली तेव्हा  राखीने आपल्या घरी असलेल्या दुचाकीत असलेले पेट्रोल काडुन स्वताःच्या अंगावर ओतुन जाळुन घेतले . यात ती पुर्णपणे जळाली असून, जवळच असणाऱ्या शेजाऱ्यांनी हा झालेला प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला.तिला वाचवण्यासाठी त्यांनी आग विझवून राखीला मेयो हॉस्पिटल मध्ये तातडिने पाठवले. परंतु राखी शंभर टक्के जळाल्यामुळे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या झालेल्या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणुन कोराडी पोलीसांनी केली आहे.