हमालाची मुलगी बनली फाैजदार

कर्जत : पोलीसनामा आॅनलाईन-

आपल्या परिवाराचा उदर्निवाह करण्यासाठी वडील हमली करतात. अशा प्रतिकुल परिस्थितीत देखील त्यांनी आपल्या मुलीला शिकवलं आणि तिने ही वडीलांच्या कष्टाचं चिज केलं. आपली मुलगी पोलीस उपनिरीक्षक झाल्याने पाठीवरील अोझे खाली उतरल्याचा आनंद पित्याला झाला आहे. शितल नवनाथ गायकवाड असे या तरुणीचे नाव आहे. डोणगाव या छोट्याशा गावातील शितल संघर्ष करत एमपीएससी परीक्षेत चाैथी आली आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c5873f9f-84f1-11e8-8421-61d6e4895feb’]

शितलने मिळविलेल्या यशाबद्दल संत कैकाडी महाराज विद्यालयय सोनेगाव येथे तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे विश्वस्त श्रीदत्त बेरंगळ, रासाहेब वायकर, मुख्याध्यापक विक्रम राजेभोसले, प्रदीप भोसले, राम ढाळे, बाळासाहेब महामुनी, वाघमारे उपस्थित होते.

शितलने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे यश मिळविले. तिचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन मुख्याध्यापक राजेभोसले यांनी केले. ते म्हणाले, शितलचे वडील पोट भरण्यासाठी गुजरातला गेले. शितलला त्यांनी सासुरवाडीला ठेवले. शितल डीएड् झाली. नोकरी मिळत नसल्याने निराश झाली नाही. लोकसेवा आयोगाचा अभ्यास केला. पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाली. तिने मिळविलेले यश सर्वांना प्रेरणा देणारे आहे.
[amazon_link asins=’B0746HF973′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cbce274e-84f1-11e8-acae-e1c84d28a0e7′]

यावेळी शितलने देखील आपले मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली की,यशासाठी प्रयत्नांची गरज आहे. सर्वांनी आई-वडिलांचे कष्ट समोर ठेवून यश मिळविण्यासाठी प्रयत्न केले तर आपल्याला यशापासून कोणीच रोखू शकत नाही.