हडपसरला गोकुळ दुधाचा टँकर फोडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाची दरवाढ व शेतकऱ्याच्या खात्यात थेट प्रति लीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेले आंदोलन आजही सुरूच ठेवले आहे. हडपसर येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गोकूळ दुधाचा टँकर फोडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबईतल्या दूध गाड्यांना संरक्षण दिले आहे.

[amazon_link asins=’B0745GF6G1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’93be67a3-8978-11e8-9ba7-45602bd934dd’]

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यांत सोमवारी शेतकऱ्यांनी दूधच न घातल्याने दूध संकलन जवळपास ठप्प झाले होते. दूध आंदोलनाचा परिणाम पहिल्या दिवशी मुंबई शहर व उपनगरांत जाणवला नव्हता. दूध वितरक व डेअरीचालकांकडे पुरेसे दूध उपलब्ध होते. आंदोलन दोन-तीन दिवस सुरू राहिल्यास टंचाई जाणवू शकते.

मुंबईचा दूध पुरवठा दुसऱ्या दिवशीही सुरळीत सुरू आहे. दूध पुरवठा सुरळीत व्हावा, अनुचित प्रकार घडू नये यासाठी दूधाच्या गाडीसोबत पोलिसांची एक गाडी फिरत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद पाहायला मिळत आहेत. पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणावर दुधाचा पुरवठा रोखण्यात आला आहे. पोलिसांनी मुंबईतल्या दूध गाड्यांना संरक्षण दिलं आहे. पोलीस सरंक्षण असतानाही  पुण्यातल्या हडपसर येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गोकूळ दुधाचा टँकर फोडला.

या आंदोलनादरम्यान एकीकडे दुधाचे टँकर रस्त्यावर रिकामे जात असताना, दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून दिल्या जात असताना, दुसरीकडे मात्र काही दूध उत्पादकांनी अनोख्या पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला. वाळवा येथे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असणारे दूध स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडे जमा केले. या दुधाचे वाटप कार्यकर्त्यांकडून गोरगरीबांमध्ये करण्यात आले. याशिवाय झोपडपट्ट्यांमधील शाळांमधील विद्यार्थ्यांनाही दुधाचे वाटप करण्यात आले.

खटावमधील उंबडेर्तील दूध उत्पादकांनी दूध संकलन करुन दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना गरम दुधाचे वाटप केले तर, शिरगावमध्ये दूध उत्पादक शेतकºयांनी शाळेत आणि गावात २०० लिटर मसाला दूध वाटले. इचलकरंजीतील झोपडपट्टी परिसरातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दुधाचे वाटप करण्यात आलं. कवठेमहांकाळमधील कुची येथे हनुमानाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर उरलेल्या दुधाचे मोफत वाटप करण्यात आले.