रिक्षाचालकाच्या मुलीची सोनेरी यशोगाथा 

 मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन 
आशियाई क्रीडा स्पर्धेत  हेप्टाथलॉन स्पर्धेमध्ये भारताला पहिलेच सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या  स्वप्ना बर्मन  हिच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे आज हेप्टाथलॉन या खेळाचे नाव अनेकांना समजले. स्वप्ना बर्मनने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करत जिद्दीने हे यश मिळवले आहे. सुवर्णपदकाच्या रुपाने तिची मेहनत फळास आली आहे . स्वप्नाचे वडील पंचम बर्मन रिक्षा चालवतात. पण गेल्या काही दिवसांपासून आजारपणामुळे ते अंथरुणाला खिळलेले आहेत.
[amazon_link asins=’B019WGI5DG,B01N9NBI7I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d7c7e45d-ac2c-11e8-b543-917b1e5bbc75′]

 तर आई बाशोना चहाच्या मळयामध्ये काम करते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना सुवर्ण पदकापर्यंत मजल मारणे ही  काही सोपी  गोष्ट नाही . पश्चिम बंगलाच्या जलपायगुरी जिल्ह्यातून आलेल्या या मुलीने अडथळ्यांची शर्यत पार करत देशाचे नाव उंचावले आहे . स्वप्नाच्या या यशाने तिच्या आई वडिलांना आकाश  ठेंगणे झाले आहे ; कारण प्रचंड काबाडकष्ट करून मुलीला खेळासाठी पाठिंबा देणाऱ्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करत तिने स्वप्न साकार केले .

पश्चिम बंगालच्या जलपायगुडीमधल्या लोकांनी मिठाई  वाटून स्वप्नाच्या विजयाचा आनंद साजरा केला. स्वप्नाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे तिच्या दोन्ही पायांना मिळून १२ बोटे आहेत. दोन अतिरिक्त बोटांमुळे तिच्या पायाला वेगळया बुटांची गरज आहे. सामान्य बूट तिच्या पायाला फिट बसत नाहीत  पण पर्याय नसल्याने ओढून ताणून तिला इतरांसारखेच बूट वापरावे लागायचे. त्यामुळे सरावा दरम्यान प्रचंड त्रास व्हायचा. आता मात्र स्वप्नाने तिच्या पायाच्या गरजेनुसार वेगळे बूट बनवले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

पिंपळे निलख येथील उद्यानासाठी चार कोटीच्या खर्चास स्थायीत मंजूरी

स्वप्नाची आई बाशोना म्हणाली, ‘स्वप्नाचं यश खरंच तिच्यासाठी सोपं नव्हतं. आम्ही प्रत्येक वेळी तिच्या गरजा पूर्ण करू शकत नव्हतो, पण तिने कधी तक्रार केली नाही. आज आम्ही आनंदी आहोत. मी आणि स्वप्नाच्या वडिलांनी तिच्यासाठी प्रचंड काबाडकष्ट घेतले. आज आमचे स्वप्न साकार झाले.

हेप्टाथलॉन खेळाबद्दल –

या खेळात अॅथलेटीक्सच्या सात प्रकारांचा समावेश असतो. यामध्ये २०० मी. आणि ८०० मी. धावण्याची शर्यत होते. त्याचबरोबर १००  मी. अडथळ्याची शर्यत खेळवली जाते. त्यानंतर उंच उडी. लांब उडी, गोळाफेक आणि भालाफेक या प्रकारांचा समावेश असतो.
 जाहीरात