खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३% ची वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य शासनाने विधानसभेच्या पार्श्वभूमिवर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. सरकारी महागाई भत्ता ९ टक्क्यावरून १२ टक्के इतकी वाढ करण्यात आली असल्याची माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

आज वित्त विभागाने यासंबंधी शासन निर्णय जारी केला असल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले, १ जानेवारी २०१९ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ जुलै २०१९ पासून रोखीने देण्यात येणार आहे. तर १ जानेवारी ते ३० जून २०१९ या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश काढले जातील.

सरकारी कर्मचारी आणि शेतकऱ्यांसाठी घ्यावे लागणारे सगळे निर्णय तातडीने घेण्याचा सरकारचा मानस आहे. त्याचाच एक भाग म्हणून वित्त विभागाने घेतेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

mahagai bhatta

 

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !

काँग्रेस पक्ष्याचे चिन्ह पण घ्या सर

वडार समाजाचे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ‘दगड फोडो’ आंदोलन

मोदी दोन मंदिरात गेले, तर केसीआर ६ मंदिरात जातील – ओवैसी