देशाला प्रोडक्शन हब बनवण्याची मोठी तयारी, सरकारनं 12 क्षेत्रांना प्राधान्य देण्याचं ठरवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशाच्या आत्मनिर्भर मोहिमेचे कार्यक्रम आणि मेक इन इंडिया यशस्वी करण्यासाठी डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनॅशनल ट्रेल अर्थात DPIIT अंतर्गत उद्योग आणि सरकारच्या प्रतिनिधींची एक समिती तयार केली गेली आहे. ही मोहीम पुढे नेण्यासाठी समिती बैठक घेऊन एक कार्यक्रम तयार करेल. समिती भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी ब्लू प्रिंट तयार करेल. यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, ऑटो कंपोनंट, फर्निचर आणि फुटवेअर यासह डझनभर क्षेत्रांची ओळख पटली आहे. समितीच्या बैठकीत आणखी आठ क्षेत्रांची ओळख पटविली जाईल.

उत्पादन वाढविण्यावर पूर्ण भर

या क्षेत्रांतील उत्पादन कार्यांना चालना देण्यासाठी व चीनसारख्या देशांमधील आयात कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या बैठकीला महिंद्रा अँड महिंद्राचे एमडी पवन गोयंका, जेएसडब्ल्यू स्टीलचे एमडी शेषागिरी राव, पीआय इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सलील सिंघल, फिक्की चे अध्यक्ष दिलीप चिनॉय, असोचेमचे अध्यक्ष दीपक सूद उपस्थित होते. या बैठकीत सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जीदेखील सहभागी झाले होते. सरकारच्या वतीने डीपीआयआयटीचे सहसचिव मनमीत नंदा, वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विद्युत विहारी स्वाइन आणि इन्व्हेस्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बागला उपस्थित होते.

सरकार आणि उद्योग प्रतिनिधींची विशेष समिती

गोयंका यांना या समितीचे अध्यक्ष केले जाऊ शकते. या बैठकीत भारताची उत्पादन क्षमता, निर्यात आणि घरगुती खप कसा वाढवायचा यावर चर्चा झाली. बैठकीत आयात कमी करण्याच्या उपायांवरही चर्चा करण्यात आली. व्यापार आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी समिती गेल्या तिमाहीपासून कृती आराखडा तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे.सभेमध्ये चंद्रजित बॅनर्जी म्हणाले की, सीआयआयने स्थानिक उत्पादकांनी बनवलेल्या वस्तूंवर स्टार सिस्टम लागू करण्याची सूचना केली आहे जेणेकरुन लोक भारतीय उत्पादने खरेदीला प्रोत्साहन देतील. इतर प्रतिनिधींनी असे सांगितले की, यावेळी भारताकडे उत्पादन क्षमता वाढवण्याच्या भरपूर संधी आहेत. उत्तम कार्यक्रम राबवून भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवता येऊ शकते.