खुशखबर ! OBC साठी सरकारने MBBS प्रवेशाच्या ९७० जागा वाढवल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आर्थिक मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी MBBS अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये वाढ केली आहे. मंत्रालयाने ५ हजार २०० जागा वाढवल्या असून महाराष्ट्रासाठी सर्वाधिक ९७० जागा वाढवण्यात आल्या आहेत. २०१९-२० या वर्षासाठी या जागा वाढविण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारची महाविद्यालये, राज्य सरकार अनुदानित सोसायट्यांकडून चालवली जाणारी महाविद्यालये, महानगरपालिकेची महाविद्यालये आणि सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरील महाविद्यालयात या जागा वाढवण्यात आल्या आहेत. मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी ९७० जागा वाढवल्या असून त्या खालोखाल गुजरातचा नंबर लागलो. गुजरातमध्ये ७०० जागा वाढवण्यात आल्या आहेत.

तसेच राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये ४५० जागा वाढवण्यात आल्या आहेत. तर आंध्रप्रदेशात ३६०, उत्तर प्रदेशात ३२६, गोवा ३० आणि सर्वात कमी २५ जागा पदुचेरी येथे वाढविण्यात आल्या आहेत. केंद्राच्या या निर्णयाचा फायदा ओबीसी समाजातील विद्यर्थ्यांना होणार आहेत. तर महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. त्यामुळे बारावीनंतर वैद्यकीय प्रवेशासाठीच्या यादीत आणखी 970 विद्यार्थ्यांना स्थान मिळणार आहे.