सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा लढा उभारू : ज्येष्ठ आयुर्वेद तज्ञ डॉ. सुहास परचुरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आयुर्वेदाच्या आंतरनिवासीय डॉक्टरांची मागणी अमान्य करून सरकार ने पुन्हा एकदा आयुर्वेदावर अन्याय केला आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्हाला लढा उभारावा लागेल. असा इशारा अखिल भारतीय नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ आयुर्वेद तज्ञ डॉ. सुहास परचुरे यांनी दिला आहे.

डॉ. परचुरे यांनी सांगितले की, शासनाने नुकताच जीआर द्वारा मोठा निर्णय जाहीर केला. एमबीबीएस व डेंटल आंतरनिवासीय डॉक्टर यांचे विद्यावेतनात घसघशीत वाढ त्यांच्या मागणीप्रमाणे जाहीर केले. पण नेहमीप्रमाणे आयुर्वेदाच्या आंतरनिवासीय डॉक्टर ची मागणी अमान्य केली. कोरोना संकटाच्या काळात आयुर्वेद डॉक्टर देखील तेवढीच सेवा देत आहेत. एप्रिल 2020 पासून त्यांचे विद्यावेतन झालेले नाही. इकडे आमच्या देशाचे आयुर्वेद शास्त्र असे म्हणत परदेशात ढोल वाजवायचे आणि प्रत्येक बाबतीत अन्याय करायचा. हे केंद्र व राज्य सरकारचे धोरण आहे. या विरोधात सर्व पदवीधरांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे. आम्ही केंद्र व राज्य शासनाकडे मागणी करतो की, आमच्याही मागण्या मान्य करा अन्यथा आम्हालाही लढा उभारावा लागेल.