सरकारने आधी ‘शालू’च्या कंमेंट्सवर Lockdown लावावा; ‘राजेश्वरी’वर गर्दी करण्याचे आरोप

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   फँड्रीफेम शालू सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव्ह असते. नागराज मंजुळे दिग्दर्शित फँड्री चित्रपटातील जब्या-शालूची जोडी त्यांची लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. हा चित्रपट चांगलाचं गाजला होता. त्यांची लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. शालूची भूमिका अभिनेत्री राजेश्वरी खरातने साकारली होती.

तिने खूप सारे फोटोशूट केले आहेत. तिचे हे फोटोशूट पाहण्यासारखे असून एकीकडे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे तिच्या फोटोंवर मिश्किलपणे कमेंट्स दिले जात आहेत. नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवरून कमेंट्सचे मीम्स तयार केले आहेत. आता या मीम्समुळे शालू अधिक चर्चेत आहे.
राजेश्वरी खरातने हे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केलेत. तिच्या या फोटोंनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. कविता, चारोळ्या या कमेंट्सनंतर आता मीम्सही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

rajeshwari kharat.jpg

 

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाची ब्रेक दी चेन होण्यासाठी राज्य सरकारने १५ दिवसांचा लॉकडाऊन लावला आहे. सार्वजनिक ठिकाणेही बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, शालूचे फोटो पाहून काही युजर्सनी फोटोवरून मीम्स तयार केले आहेत. हा मीम इतका व्हायरल झाला आहे की, तिच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. ‘सरकारने सर्वात आधी फँड्रीतल्या शालूच्या फोटोंवरच्या कमेंट्सवर लॉकडाऊन लावावा, तिथेच सर्वात जास्त गर्दी होते’. या मीमनंतर शालू पुन्हा चर्चेत आली आहे.