पत्रकारांसाठी शासनाने राखीव बेड व मृृताच्या नातेवाईकाला 50 लाख मदत करावी

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आनेक पत्रकार कोरोनाशी लढा देत आहेत.तर कीत्येक जणांनी आपला प्राण गमावला आहे. लाॅकडाउन काळात इंदापूर तालुक्यातील पाच पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचेवर इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या ठीकाणी उपचार सुरू आहेत.

परंतु शासनाला पत्रकारांच्या समस्या व मागण्याविषयी घाम फुटत नाही. शासनाकडून इंदापूर तालुक्यातील पत्रकारांना कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड राखीव ठेवण्यात यावेत, पत्रकाराचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुंटूबाला ५० लाख रुपयांचा निधी जाहिर करण्यात यावा याबाबतचे निवेदन इंदापूर तालुका मराठी पत्रकार परिषद संलग्न इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने मंगळवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी इंदापूर निवासी नायब तहसिलदार एस.एम. अभंगराव यांना देण्यात आले.यावेळी देशात कोरोना संसर्गामुळे मृत पावलेल्या पत्रकार बांधवाना श्रद्धांजली वाहण्यात आली.

इंदापूर तालुक्यात कोरोना महामारीचा उद्रेक सुरुच आहे.परंतु रात्रंदिवस बातम्यांचे अपडेट देणार्‍या पत्रकारांसाठी शासनाकडुन कोणत्याही सोई सुविधा अथवा संरक्षण देण्यात आलेले नाही.परिणामी पत्रकारांचे आरोग्य धोक्यात आले असुन इंदापूर तालुक्यामध्ये कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १ हजार ७०० च्या पुढे गेली आहे.यामध्ये एकुण ४६ जणांचा मृत्यु झाला आहे.तर ७००पेक्षा जास्त रूग्णांवर सध्या इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या ठीकाणी उपचार सुरू असुन ९१३ रूग्ण बरे झाले आहेत. दर दिवसागणीक कोरोना बाधीत रूग्णांच्या संखेत वाढ होत असुन तालुक्यातील १०० पेक्षा जास्त पत्रकार बांधव वेगवेगळ्या सदरातुन बातम्यांचे अपडेट सर्वांपर्यंत पोहचवत आहेत.यामध्ये तालुक्यातील ५ पत्रकारांना कोरोनाची लागण झाली असुन शासन स्तरावरून त्यांना कोणत्याही सुविधांचा लाभ मीळत नाही. सध्याच्या काळात पत्रकार हे हालाखीचे जीवन जगत आहेत.परंतु शासनाला पत्रकारांच्या अडी अडचणीबाबत जाग येत नाही.

पत्रकारांच्या समस्या शासनापर्यंत पोहचवुन झोपेचे सोंग घेणार्‍या शासनाला जाग आणण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हास्तर, तालुकास्तर, गावपातळीवर प्रत्येक ठीकाणी शासकीय कार्यालयाना निवेदन सादर करून पत्रकारांच्या समस्या शासनापर्यंत पोहचविण्याची मोहीम राज्यभरात युद्ध पातळीवर सुरू असुन इंदापुर तालुक्यातील पत्रकारांच्या मागण्याबाबतचे निवेदन इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाणच्या वतीने इंदापूर निवासी नायब तहसिलदार यांना देण्यात आले.यावेळी यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे पूणे जिल्हा सरचिटणीस, सतिश सांगळे, इंदापूर तालुकाध्यक्ष राजकुमार थोरात, बाळासाहेब धवडे, रामदास पवार, सुधाकर बोराटे, बाळासाहेब सुतार, रोहित वाघमोडे उपस्थित होते.