सरकारने CAA कायद्याचा ‘फेरविचार’ करावा : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सीएए कायद्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की सरकारने सीएए कायद्याचा फेरविचार करावा. तसेच ते पुढे म्हणाले की ओबीसी समाजाचा सरकारवरील विश्वास वाढावा यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे.

नाना पटोले म्हणाले की, ओबीसी समजासाठीचे आरक्षण आणखी 10 वर्षांसाठी वाढवण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. त्यानंतर बोलताना नाना पटोले म्हणाले की एससी, एसटी समाजाला ज्याप्रमाणे सर्वांच्या बरोबरने आणण्यासाठी घटनेत बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूदी केल्या आहेत. त्याच प्रमाणे कलम 340 प्रमाणे ओबीसी समाजासाठी देखील काही तरतूदी करण्यात आल्या आहेत.

1931 सालाच्या आधारे आज देखील त्याच निकषांवर ओबीसी समाजाला आरक्षण देण्यात येते. त्यामुळे देशभरातील ओबीसी समाजामध्ये या बाबात तीव्र संताप आहे असे ही नाना पटोले म्हणाले.

पुढे बोलताना पटोले म्हणाले की एससी, एसटी या आरक्षणासाठी जो आणखी 10 वर्ष वाढण्याच्या कालावधीचा प्रस्ताव आला होता त्या प्रमाणे ओबीसी समाजाचा प्रस्ताव देखील माझ्याकडे आला आणि विशेष अधिकारांचा वापर करुन मी प्रस्ताव मांडला. ओबीसी समाजाचा सरकारवरील विश्वास वाढावा यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे. जनतेच्या भावना अध्यक्षांनी लक्षात घेणे आवश्यक असते, विधानसभेचा अध्यक्ष म्हणून मी ही भूमिका मांडत आहे.

सीएए कायद्याबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले की सीएए कायद्याबाबत सरकारने फेरविचार करावा, विद्यार्थ्यांच्या भावना सरकारने समजून घ्यायला हव्यात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/