1 डिसेंबरपासून देशभरात ‘लॉकडाउन’ पुन्हा लागू होणार ? जाणून घ्या ‘या’ व्हायरल ‘ट्विट’ची सत्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सोशल मीडियावर सध्या बनावट मेसेज व्हायरल होत आहेत. या व्हायरल मेसेजसमध्ये बरेच दावे केले जात आहेत. सोशल मीडियावरील ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत असून, 1 डिसेंबरपासून पुन्हा देशभरात लॉकडाउन लागू करण्यात येईल, असा दावा व्हायरल ट्विटमध्ये करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. पण पीआयबीने हे ट्विट नाकारले आहे.

वास्तविक, पीआयबीने या व्हायरल ट्विटच्या सत्यतेची चौकशी केली आणि तपासणीनंतर हे ट्विट बनावट असल्याचे घोषित केले आहे. सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे पीआयबीने नमूद केले आहे.