The Great Firwall of China : जागतील टॉप वेबसाइट इथं ब्लॉक, अशी काम करते चीनमध्ये ‘सेन्सॉरशिप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   ग्रेट फायरवॉल ऑफ चायना, ऐकण्यास ग्रेट वॉल ऑफ चायनाशी मिळते-जुळते वाटते. यापैकी एक ब्रिकची वॉल आहे, तर दुसरी वर्च्युअल वॉल आहे. द ग्रेट फायरवॉल ऑफ चायना ही इंटरनेट सेन्सॉरशिप आहे, जी चायना वापरते. यास जगातील सर्वात अ‍ॅडव्हान्स इंटरनेट सेन्सॉरशिप आणि गोल्डन शील्ड प्रोजेक्टसुद्धा म्हटले जाते.

चीनमध्ये इंटरनेट फ्रीडमचा स्तर खुपच खराब आहे आणि या लिस्टमध्ये चीन नंबर एकवर आहे. मात्र, चीनकडे गुगल आणि फेसबुकसारख्या मोठ्या वेबसाइटसाठी उत्तम पर्यायदेखील आहेत, जे चीनचे स्वत:चे आहेत. यामुळेच चीनमध्ये फेसबुक, गुगल, विकिपिडिया आणि ट्विटरसारखी जगातील पॉप्युलर वेबसाइट ब्लॉक आहे. मात्र, चीनमध्ये सोशल मीडिया आणि मेसेजिंगपासून सर्च इंजिनपर्यंत अनेक पर्याय आहेत, जे येथील लोक वापरतात.

चीन याच फायरवॉल अंतर्गत कंटेन्टसुद्धा सेन्सॉर करतो. याची वेगवेगळी कारणे आहेत. अनेकदा तेथे सर्च इंजिन रिजल्टमध्ये सुद्धा मॅनिप्युलेशन केले जाते. वेबसाइट्स आणि यूआरएल ब्लॉकबाबत बोलायचे तर या फायरवॉलद्वारे वैयक्तिक वेबसाइट्स ब्लॉक केल्या जातात. इतकेच नव्हे, ही फायरवॉल ब्लॅकलिस्ट केलेल्या किवर्डला वेबपेजवरून स्कॅन करून त्यास ब्लॉक करते.

उदाहरणार्थ, एखाद्या खास किवर्डला या फायरवॉलमध्ये ब्लॉक करण्यासाठी लावण्यात आले तर ही फायरवॉल इंटरनेटवर वेबपेजला स्कॅन करून त्या किवर्डच्या वेबसाइट्सला ब्लॉक करेल. चीन हा देश बाहेरच्या सोशल नेटवर्किंग वेबसाइट्सला ब्लॉक करून लोकांना त्यांचा पर्याय वापरण्यासाठी एक प्रकारची जबरदस्ती करतो. मात्र, तेथील अल्टरनेटीव्ह सोशल मीडिया आणि ई-मेल वेबसाइट्स खुपच उत्तम आहेत आणि फेसबुकच्या लेव्हलच्या आहेत.

असे नाही की या ग्रेट फायरवॉलमध्ये घुसखोरी करता येणार नाही. हेदखील शक्य आहे. परंतु, हे थोडे अवघड आहे. फायरवॉल बायपास करण्यासाठी अनेक प्रकारचे अ‍ॅडव्हान्स प्रकारचे व्हीपीएन सोल्यूशन येतात आणि काही लोक याचा वापर सुद्धा करतात. ग्रेट फायरवॉल ऑफ चायनाचे एक काम हेसुद्धा आहे की, तिने क्रॉस बॉर्डर इंटरनेट ट्रॅफिक करावे ज्यामध्ये दुसर्‍या देशांच्या मोठ्या वेबसाईट्स असतात.

अनेकदा वेबसाइट्सला ब्लॉकसुद्धा केले जात नाही, परंतु तिला मर्यादा घातली जाते. अशाप्रकारे कंटेन्ट केवळ चीनसाठी आणि चीनमध्येच डेव्हलप केले जाते. ग्रेट फायरवॉल ऑफ चायना किंवा गोल्डन शील्ड प्रोजेक्टची सुरूवात 1998 मध्ये केली गेली होती. आणि लागोपाठ यामध्ये बदल केले जात आहेत. फायरवॉल हा प्रकार आपणही आपल्या कम्प्युटरमध्ये वापरत असतो.

काही बेसिक पद्धतीबाबत बोलायचे तर यामध्ये आयपी ब्लॉकिंग आणि डीएनएस ब्लॉकिंग असते. कारण चीनची लोकसंख्या खुपच जास्त आहे, यासाठी हे मोठ्याप्रमाणात केले जाते आणि यासाठी तिला फायरवॉल नव्हे, ग्रेट फायरवॉल म्हटले जाते. ग्रेट फायरवॉलमुळेच इंटरनेट फ्रीडममध्ये सर्वात खराब प्रदर्शन करणार्‍या देशांत चीनचा पहिल्या नंबरवर आहे. या यादीत भारत 10 व्या नंबरवर आहे.