‘कोरोना’च्या ‘कंट्रोल’साठी चीनमधील ग्रेट ‘वॉल’ बंद !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘कोरोना’ ह्या संसर्गजन्य आजारावरील नियंत्रणासाठी चीन सरकारने जगप्रसिद्ध ग्रेट वॉलचा काही भाग पर्यटकांसाठी बंद केला आहे. चीनमधील वुहान शहरात ‘कोरोना’चा संसर्ग झालेला रुग्ण आढळला आणि खळबळ उडाली. या गंभीर आजारात थंडीताप येऊन फुफ्फुसावर परिणाम होतो. या आजारामुळे चीनमधील नऊ जणांचा मृत्यू झाला असून ४४०जणांना संसर्ग झाला आहे.

‘कोरोना’ला नियंत्रणात आणण्यासाठी चीन सरकारने कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. गेल्या दोन दिवसात चीनमधील पाच शहरांमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याची दखल घेऊन सर्व देशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची भारतात अधिक काळजी घेतली जात आहे. ‘कोरोना’ची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार करण्यासाठी विमानतळावरच कक्ष सज्ज ठेवले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like