हेल्मेट न घातल्याने गमावला जीव..

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – रस्त्यावरून वळण घेतांना दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने गाडी स्लिप होऊन तरुण रस्त्यावर पडला. हेल्मेट परिधान न केल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास हिंजवडी येथील पॉवर हाऊस जवळ झाला.

अमन पांडे ( 20, रा. मध्यप्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन हा युवक हिंजवडी जवळील इंदिरा महाविद्यालयात बीबीए च्या द्वितीय वर्षात शिकत होता. आज सकाळी नातेवाईकाला सोडण्यासाठी तो त्याच्या दुचाकी क्रमांत (एम एच 12 / सी एम 2633) वरून हिंजवडी येथील टीसीएस कंपनीत आला होता. त्यांना कंपनीत सोडून तो परत महाविद्यालयाकडे जात असतांना. हिंजवडी मधील पॉवर हाऊस जवळच्या वळणावर त्याचे त्याच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी स्लिप झाल्याने तो खाली पडला. गाडीचा वेग जास्त असल्याने तो दूरपर्यंत घसरत गेला. त्याने हेल्मेट न घातल्याने डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यात त्याचा जागीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेबाबद हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.