रस्त्यावर ‘मोकाट’ फिरणाऱ्या जनावरांनी घेतला शिक्षिकेचा ‘जीव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रस्त्यावर फिरणाऱ्या आवारा प्राण्यांनमुळे एका शिक्षिकेचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये शिक्षिकेला आपले प्राण गमवावे लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोठावाल गावातील शिक्षिका रोज सुल्तानपुर लोधी येथील एका खाजगी शाळेत आपल्या अ‍ॅक्टिव्हावरून प्रवास करत शिकवण्यासाठी जात होती.

शुक्रवारी सकाळी ती आपल्या अ‍ॅक्टिव्हावरून शाळेच्या दिशेने जात असताना, डडविंडी गेटच्या आधी, कमलपूर गौशालाजवळील टर्निंग पॉईंटवर एका प्राण्याला धडकून खाली पडली, त्यानंतर तत्काळ सुल्तानपुर लोधीच्या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजताच डॉक्टरांनी त्यांना जालंधर येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला, आरसीएफ जवळच त्यांचा मृत्यू झाला.

या संबंधित मुलीचे काका हरजिंदर सिंग यांच्या मते, मनमीत कौर अभ्यासामध्ये खूप हुशार होत्या आणि तिला शिक्षक म्हणून शिकवण्याची इच्छा होती. त्यांनी सांगितले की, ती स्कूटीवर दररोज शाळेत जात असे, परंतु गेल्या काही दिवसांपासून थंडी व धुक्यामुळे स्कुटी डडविंडी स्टँडवर पार्क करून शाळेत जात होती. त्यांनी सांगितले की, मनमीतचे वडील दुबईत आहेत, त्यांना माहिती मिळाली आहे आणि दोन भाऊ त्यांना देखील या अपघाताबाबत माहिती देण्यात आलेली आहे.

संपूर्ण गावात शासकीय गौशाला असूनही प्रशासनाच्या दुर्लक्षांमुळे प्राणी रस्त्यावर मोकळे फिरतात आणि त्यामुळेच हा अपघात झाला आहे. जेव्हा सरकार लोकांकडून गौशाळेच्या नावावर कर आणि निधी जमा करते, तेव्हा त्यांच्यासाठी चांगला बंदोबस्त का करत नाही असा सवाल यावेळी शिक्षिकेच्या वडिलांनी उपस्थित केला. शिक्षिकेच्या मृत्यूची बातमी समजताच गाव व शाळेत शोककळा पसरली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/