गुन्ह्याची कबुली देणार्‍याची उच्च न्यायालयाने ‘या’ कारणासाठी केली निर्दोष सुटका

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ कारणावरुन त्याने रामाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यु झाला. या गुन्ह्याची त्याने कबुलीही दिली. सत्र न्यायालयाने त्याआधारे त्याला शिक्षा सुनावली. पण, आरोपीने स्वत: गुन्हा कबूल करण्याला कायद्याच्या दृष्टिकोनातून महत्त्व नाही. त्यामुळे आरोपीचा कबुलीजबाब स्वीकारला जाऊ शकत नाही. आरोपीविरुद्ध ठोस पुराव्यांसह गुन्हा सिद्ध करणे आवश्यक असते, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले.

मिलिंद नथ्थू बनकर (वय ५०, रा. जांब, ता. समुद्रपूर, वर्धा) असे आरोपीचे नाव आहे. तर रामा गिरडकर असे खुन झालेल्याचे नाव आहे. १२ मे २००३ रोजी आरोपीने रामाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.

वर्धा सत्र न्यायालयाने कबुलीजबाबाच्या आधारावर आरोपीला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यामध्ये तीन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध आरोपीने अ‍ॅड. राजेंद्र डागा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपीलवरील अंतिम सुनावणीदरम्यान अ‍ॅड. डागा यांनी आरोपीचा कबुलीजबाब स्वीकारला जाऊ शकत नाही, असे सांगितले. तसेच, आरोपीविरुद्ध याशिवाय दुसरा पुरावा नसल्याची माहिती दिली. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, हे निरीक्षण नोंदवून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला व आरोपीला निर्दोष सोडण्याचा आदेश दिला.

आरोग्यविषयक वृत्त –

फक्त “दारूमुळेच” जगभरात दरवर्षी ६ टक्के लोकांचा मृत्यू 

पालकभाजी आरोग्यासाठी फायदेशीर 

 ‘सेक्स पॉवर’ जागृत करण्‍यासाठी करा योगासने

“पॅरालिसिसकडे” दुर्लक्ष करू नका