वाकड मध्ये हॉटेल सरोवर समोर महामार्ग रोखला

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मागील चार दिवसांपासून दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी सुरु असलेल्या दूध बंद आंदोलनाचे परिणाम शहरात उमटू लागले आहेत.दूध वाहतूक करणाऱ्या टँकरची तोडफोड, दूध रस्त्यावर ओतून देण्याचे प्रकार सुरु असताना गुरुवारी दुपारी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाकड येथे काही वेळ रस्ता रोखो करण्यात आला आहे.

द्रुतगती महामार्गावर सरोवर हॉटेलच्या समोर स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दगडे, टायर टाकून अडवून धरला. 10 ते 15 मिनिटात पोलीस घटनस्थळी दाखल झाल्यानंतर तेथून कार्यकर्ते निघून गेले. पोलिसांनी रस्त्यावरील दगडे, टायर बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2507a791-8b3b-11e8-ace0-8d7a701c4bf4′]

शहरात दूध वितरण पूर्णपणे ठप्प झाले आहे. शहरातील दूध आणि दूध उत्पादने विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. ज्या दुकानदारांकडे घरच्या जनावरांचे दूध आहे, असेच दुकानदार दुकाने सुरु ठेवत आहेत. पिंपरी मार्केटमध्ये केवळ एक चहाचे दुकान सुरु आहे. अन्य दुकानदार आणि चहा टपरीवाल्यांनी दूध नसल्यामुळे दुकान बंद ठेवले आहे.

सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अमरावती तसेच राज्याच्या विविध भागात दुधाचे टँकर अडवून दूध रस्त्यावर ओतून देण्यात आले. काही ठिकाणी दुधाचे टँकर फोडले. त्यामुळे बुधवारी (दि. 18) पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु केली. डेक्कन, अलंकार आणि हडपसर पोलीस ठाण्यामध्ये आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.