धक्कादायक ! बील जमा न केल्यानं हॉस्पीटलनं रूग्णाला चक्क 5 दिवस ठेवलं ‘ओलिस’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – येथील कैलास कॉलनीतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयात मोहम्मद उमर (वय ४८) या रुग्णास पाच दिवसांपासून ‘वैद्यकीय बंधक’ म्हणून ठेवले होते. तेथे त्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णालयाने बिल जमा न केल्याने रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांना सोडण्यास नकार दिला. ओमरच्या कुटुंबीयांनी रुग्णालयावर आरोप केला आहे की,’रुग्णालयाकडे स्पष्ट केले होते की ते आर्थिक कारणामुळे शस्त्रक्रिया करू शकत नाहीत परंतु रुग्णालयाने त्यांना जबरदस्तीने दाखल केले’.

रुग्णालयाने त्यांना विमा कंपनीकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि विमा कंपनीकडून मान्यता मिळाल्याचा दावाही केला. परंतु शस्त्रक्रियेनंतर मात्र मॅनेजरने असे म्हटले की विमा कंपनीने पैसे देण्यास नकार दिला, तसेच रुग्णाला पैसे देईपर्यंत सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.

मिळालेल्या माहितीप्रमाणे एप्रिल २०१७ मध्ये एका खटल्याची सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले होते की जर रुग्ण बिले सादर करू शकत नाहीत तर रुग्णालय त्यांना ओलिस ठेवू शकत नाही. ११ ऑगस्ट रोजी मूत्राशयाच्या शस्त्रक्रियेनंतर दुसर्‍या दिवशी उमरला डिस्चार्ज दिला जाणार होता. परंतु विमा कंपनीकडून देय देण्यास मान्यता होईपर्यंत १६ ऑगस्टपर्यंत त्याला ओलिस ठेवले होते. दरम्यान, हॉस्पिटल जनरल वॉर्डनुसार दररोज बिलात १०० रुपये वाढ करणे देखील सुरू होते.

दुसरीकडे, या संदर्भात अपोलो स्पेक्ट्राच्या प्रवक्त्याला विचारले तेव्हा त्यांनी दावा केला की रुग्णाला ताब्यात/किंवा ओलीस ठेवले नव्हते तर विमा कंपनीला शस्त्रक्रियेबाबत स्पष्टीकरण हवे होते. त्यांना रुग्णालयात रूग्ण पहायचे होते जेणेकरुन पडताळणी करता येईल. रुग्ण कॅथेटरवर असल्याने आम्ही त्यांना अधिक चांगल्या प्रकारे आणि काळजीपूर्वक ठेवले.

अमरच्या कुटुंबीयांचा आरोप :

दुसरीकडे, उमरचा मुलगा इम्रान म्हणतो की हे खोटे आहे कारण विमा एजंट १० ऑगस्टला चौकशी करून गेले होते, त्या दरम्यान त्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली, डॉक्टरांना भेटले आणि माझ्या वडिलांची सही घेतली. ओमर याला लघवी करण्यास त्रास होत होता. ७ ऑगस्ट रोजी त्यांनी एका लेप्रोस्कोपिक सर्जनशी संपर्क साधला असता त्याने त्याला अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले जिथे त्यांचे ऑपरेशन झाले.

या कुटुंबाने यापूर्वीच ३००० रुपये खर्च केले होते, ज्यात सोनोग्राफीचा समावेश होता. शस्त्रक्रियेचा खर्च सांगितल्यावर इम्रानने हॉस्पिटलला सांगितले की ही इतकी रक्कम तो भरू शकत नाही. मात्र वडिलांचा विमा उतरविला होता असेही त्याने सांगितले. आहे इम्रान म्हणाले, “आमच्याकडे पैसे नसल्याचा मी वारंवार आग्रह धरला आणि रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी आम्हाला आश्वासन दिले की विमा कंपनीकडून मान्यता मिळाल्यावर शस्त्रक्रिया केली जाईल.”

वडिलांना रुग्णालयातून सोडण्यात नकार मिळाल्यानंतर इम्रानने १६ ऑगस्ट रोजी कॅम्पेन फॉर डिग्निफाइड अँड अफोर्डेबल हेल्थकेअरच्या मालिनी यांची मदत घेतली. त्यांनाही दवाखान्यातर्फे सांगण्यात आले होते की जेव्हा हे बिल सादर केले जात नाही तोपर्यंत रुग्णास सोडले जाणार नाही. विमा कंपनीकडून मान्यता मिळाल्यावर अखेर ओमरला डिस्चार्ज देण्यात आला.

आरोग्यविषयक वृत्त –