हॉटेलची अजब ऑफर, पाकिस्तान मुर्दाबाद म्हणा आणि १० टक्के सुट मिळवा

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्याचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यामुले भारतात सर्वत्र रोष व्यक्त होत आहे. पाकिस्तान विरोधातील राग लोक वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत आहेत. तर विविध पद्धतीने भारतीय नागरिक आपल्या शहीद जवानांना श्रद्धांजली देत आहेत. नवी मुंबईच्या खारघरमधील हॉटेल व्यावसायिकाने पाकिस्तानचा विरोध वेगळ्या प्रकारे व्यक्त केला आहे.

‘लकी तवा हॉटेल’चा मालक सय्यद खान यांनी आपल्या ग्राहकांसाठी प्रत्येक ऑर्डरवर १० टक्के सूट देण्याची ऑफर दिली आहे. मात्र ही सुट मिळवण्यासाठी त्यावर त्यांनी एक अट ठेवली आहे. १० टक्के सूट मिळवण्यासाठी ग्राहकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा द्याव्यात अशी ही अट आहे.

नवल म्हणजे हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांनीही या अनोख्या ऑफरचे स्वागत केले आहे. येणारा प्रत्येक ग्राहक पाकिस्तान विरोधातील रोष याठिकाणी जाहीर करतो. पाकिस्तान विरोधात असलेली खदखद जोरदार घोषणाबाजीने व्यक्त करतो आहे.

दरम्यान, या हॉटेलची ही ऑफर सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकही या ऑफरचा फायदा घेण्यासाठी गर्दी करत आहेत. सैन्यात जाऊन आम्ही काम करू शकत नाही, म्हणून पाकिस्तानचा निषेध या पद्धतीने करतो आहे, अशी प्रतिक्रिया हॉटेल मालक सय्यद खान यांनी दिली आहे.

Loading...
You might also like