51 वर्षीय पतीनं पत्नीकडं रात्री उशिरा मोबाईल मागितला, त्यामध्ये तिचा शेवटी ‘जीव’च गेला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील चेंबूर परिसरात रागावर नियंत्रण मिळवता न आल्याने 52 वर्षांच्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत चेंबूरच्या RCF पोलिसांनी अधिक माहिती दिली.

चेंबूरमधील म्हाडा कॉलनीत रविवारी रात्री ही घटना घडली आहे. जेम्स जॉन करय्याहा रविवारी रात्री खूप दारू पिऊन घरी आला. त्यानंतर त्याने पत्नी राबिया जेम्स करय्याकड़े तिचा मोबाइल मागितला. तिने मोबाईल देण्यास नकार दिला त्यामुळे पती जेम्स जॉन करय्याहा चिडला. त्यानंतर ती आपल्याला मोबाईल हा नाही का म्हणाली यावरुन जेम्स व राबियामध्ये मोठा वाद सुरू झाला. वाद एवढा विकोपाला गेला की त्याने राबियाला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यांनतर जेम्सने किचनमध्ये जाऊन चाकू आणि पत्नीवर वार केले. राबिया जमिनीवर कोसळली व त्याचक्षणी तिचा मृत्य़ू झाला. पत्नीला जमिनीवर मृत अवस्थेत पाहून जेम्स घाबरला. जेम्स पळून जात असताना घरातील व शेजारील लोकांनी त्याला पकडले आणि पोलिसाच्या ताब्यात दिले.

राबिया ही जेम्सची दुसरी बायको होती. त्याची पहिली बायको मानखुर्दमध्ये राहत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी जेम्सवर खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.