पतीने रेल्वेखाली उडी घेतल्यानंतर पत्नीने मुलीसह उचललं ‘हे’ पाऊल !

नोएडा : वृत्त संस्था – तीन महिन्यांपूर्वीच भारतात आलेल्या पतीने सकाळी मेट्रोखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ते समजल्यानंतर पत्नीने आपल्या ५ वर्षाच्या मुलीसह घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांनी आत्महत्या का केली, हे अद्याप पुढे येऊ शकले नाही.

याबाबतची माहिती अशी, भरत जे हे आपल्या पत्नी व ५ वर्षाच्या मुलीसह सप्टेंबर २०१९ मध्ये भारतात राहण्यास परत आले होते. भरत हे एका मोठ्या चहा कंपनीत जनरल मॅनेजर होते. त्यांची पत्नी गृहिणी होती.
नोएडा सेक्टर १२८ मधील जे पी पव्हेलियन कोर्ट मध्ये ते रहात होते. भरत हे शुक्रवारी सकाळी घरातून बाहेर पडले. ते जवाहरलाल नेहरु मेट्रो स्टेशनवर गेले.

त्यांनी मेट्रो ट्रेनच्या समोर उडी मारुन आत्महत्या केली. ही बाब त्यांच्या पत्नीला समजल्यानंतर त्यांनी आपली ५ वर्षाची मुलगी व स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, या कुटुंबावर कोणता ताणतणाव असल्याची माहिती प्राथमिक तपासात तरी पुढे आलेली नाही. त्यांच्या घरातील कागदपत्रे, मोबाईलवरील माहितीवरुन त्यांच्या आत्महत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like