सासऱ्याचं व सुनेचं होतं ‘झेंगाट’ ; अडथळा ठरणाऱ्या पतीचा लावला ‘निकाल’

अमरावती : पोलीसनामा  ऑनलाइन – अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने व नेहमीच्या घरगुती भांडणास कंटाळून पत्नी व सावत्र सासऱ्यानेच पतीची हत्या केल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आली आहे. सदरच्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना दत्तापूर पोलिसांनी अटक केली आहे.

तालुक्यातील गंगाजळी या गावानजीकच्या उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात एका ३० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रविवार, २३ डिसेंबर रोजी संध्याकाळी आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटली असून, मृतक व्यक्ती धामणगाव येथील रहिवासी आहे. यामध्ये आरोपी म्हणून दादाराव मरसकोल्हे (४९) व मृतकाची पत्नी कुसुम मोरेश्वर सावरकर (३०) यांना अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे कुसुमनेच मोरेश्वरच्या हत्येची तक्रार दिली होती. मागील अनेक वर्षांपासून मृतकाचा सावत्र सासरा दादाराव व कुसुम यांचे अनैतिक संबंध होते. मोरेश्वर हॉटेलमध्ये कामावर गेल्यानंतर दादाराव हा कुसुमला पैसे द्यायचा. घटनेच्या पहिल्या दिवशी शनिवारी मोरेश्वर हा दारू पिऊन घरी आला. नंतर दादारावने मागील दरवाजातून घरात प्रवेश केला. मोरेश्वर झोपल्याची खात्री करून दादारावने रुमालाने मोरेश्वरचा गळा आवरला. तो तडफडत असल्याचे पाहता कुसुमने त्याचे दोन्ही हात पकडले.

महिलेने गुप्तांग कापलेल्या डोंबिवलीतील तरुणाचा मृत्यू 

You might also like