चार महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून करून पती पसार

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – चार महिन्याच्या गरोदर असलेल्या पत्नीचा खून करून पती पसार झाल्याची घटना केज तालुक्यातील बनसारोळा येथे रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला.

काजल ज्ञानेश्वर गोरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर ज्ञानेश्वर गोरे असे पसार झालेल्या पतीचे नाव आहे.

काजल हिचा केज तालुक्यातील बनसारोळा येथील ज्ञानेश्वर गोरे याच्यासी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी झाली. विवाहानंतर ज्ञानेश्वरला दारूचे व्यसन जडले. दारूच्या नशेत तो काजलला मारहाण करायचा. ती चार महिन्यांची गरोदर राहिली. रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास काजल पाणी भरण्यासाठी जात असताना ज्ञानेश्वरने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर १०८ क्रमांकावर फोन करून तिला बाळंतपणासाठी घेऊन जायचे आहे.

असे सांगून रुग्णवाहिका बोलवली. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केल्यावर तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. डॉक्टरांनी याची माहिती युसुफवडगाव पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी बनसारोळा येथे य़ेऊन तिचा मृतदेह ताब्यात अंबाजोगाई य़ेथे पाठवून देण्यात आला. त्यानंतर ज्ञानेश्वर गोरे हा पसार झाला आहे.

ह्याहि बातम्या वाचा

माढा मतदार संघाबद्दल शरद पवार पुनर्विचार करणार काय ?

भारताच्या मायकल जॅक्सनचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान

काँग्रेस महाराष्ट्रातील लोकसभेची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता

पोलिसांवर गंभीर आरोप करत तरुणाची आत्महत्या ; पुण्यात खळबळ

भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा विखेंना कडाडून विरोध !