हैदराबादच्या कंपनीने 8 बँकांना घातला 4 हजार 837 कोटींचा गंडा

नवी दिल्ली : हैदराबाद येथील एका खासगी कंपनीने ८ बँकांना तब्बल ४ हजार ८३७ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या(State Bank of India) तक्रारीनंतर सीबीआयने(CBI)  हैदराबादची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आयवीआरसीए (Infrastructure company IVRCA)आणि त्यांचे व्यवस्थापकीय संचालक ई सुधीर रेड्डी, सहायक व्यवस्थापकीय संचालक आऱ बालारामी रेड्डी यांच्याविरु८ फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयचे प्रवक्ते आऱ सी़ जोशी यांनी सांगितले की, आरोपींनी अज्ञात लोकसेवक आणि अन्य व्यक्तीबरोबर संगनमत करुन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची फसवणूक केली आहे. या मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय, कॅनरा बँक, आंध्रा बँक, कॉपोरेशन बँक, एक्झिम बँक, पंजाब अँड सिंध बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांचा समावेश आहे. यामध्ये बँकाची एकूण ४ हजार ८३७ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

कंपनीने बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते न फेडता बँकांची फसवणूक केली आहे. फॉरेन्सिक ऑडिट अहवालानुसार, कंपनीने संबंधित खाते पुस्तकांमध्ये कोणतेही खरेदी व्यवहार नोंदविल्याशिवाय, एलसीमार्फत पैसे दिले आणि त्याचा पैसा कंपनीच्या खात्यात वळविला आणि त्याद्वारे बँकेच्या निधीचा गैरवापर केला, असा आरोप करण्यात आला आहे. हैदराबाद येथील आरोपींच्या निवासी व कार्यालयांवर छापे घालून त्यांचा शोध घेण्यात आला. काही कागदपत्रेही सीबीआयने हस्तगत केली आहेती.