वर्ल्डकप मधील भारत-पाक सामन्याला ICC चा हिरवा कंदील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यानंतर भारत – पाक या दोन्ही देशात तणावपूर्ण संबंध होते . याचे पडसाद क्रिकेट विश्वावर देखील उमटत होते . भारत -पाक तणावात आगामी क्रिकेट विश्वचषक सामना खेळवला जाऊ नये , अशी चर्चा होत होती . मात्र आता इंग्लंडमध्ये ३० मे ते १४ जुलैदरम्यान विश्वचषकाच्या महासंग्रामातील भारत-पाक सामन्याला कोणताही धोका नसल्याचं वक्तव्य आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांनी केला आहे .  त्यामुळे क्रिकेट प्रेमींना भारत-पाक सामन्याचा थरार अनुभवता येणार आहे.

भारत-पाक क्रिकेट सामना हा प्रत्येक क्रिकेट प्रेमींकरिता अनोखी पर्वणीच असते . आगामी विश्वचषकामधील भारत-पाक सामन्याबाबत दोन्ही संघांचा आयसीसीबरोबर करार झाला आहे .  त्यामुळे या दोन संघांत १६ जून रोजी होणारा सामना ठरलेल्या वेळेतच होणार आहे.

सुरक्षेला प्राधान्य

याबरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं न्यूझीलंडमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी वन डे विश्वचषकादरम्यान सुरक्षेला पूर्ण प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती रिचर्डसन यांनी दिली . इंग्लंडमध्ये ३० मे ते १४ जुलैदरम्यान विश्वचषकाचा महासंग्राम रंगणार आहे . त्यासाठी आयसीसीकडून इंग्लंडमधल्या सुरक्षा एजन्सीजच्या सहकार्यानं सुरक्षेच्या सर्व बाबींवर बारकाईनं लक्ष देण्यात येणार आहे.

ख्राइस्टचर्च येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जण मृत्युमुखी पडले आहेत .  या गोळीबारात बांगलादेशचे क्रिकेटपटूं थोडक्यात बचावले .  या घटनेमुळे बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना तात्काळ रद्द करण्यात आला असून बांगलादेशचे खेळाडू मायदेशी परतले आहेत .

Loading...
You might also like