27 वर्षीय IPS अधिकार्‍यानं कोरोनाला हरवलं, ‘प्लाझ्मा’ केला ‘दान’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या लढ्यात अनेकजण योगदान देत आहेत. कोरोनाला हरविल्यानंतर एका 27 वर्षीय आयपीएस अधिकारी असलेला आदित्य मिश्रा रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनावर नेमका उपचार नसल्याने प्लाझ्मा थेरेपी केली जात आहे. त्याने प्लाझ्मा दान करीत रुगसेवा केली आहे.

महाराजा यशवंतराव चिकित्सालयातील ट्रान्सफ्युजन मेडिकल विभागाचे प्रमुख डॉ. अशोक यादव यांनी सांगितले की, वर्ष 2018 चे प्रशिक्षणार्थी असलेले आयपीएस अधिकारी आदित्य मिश्रा यांनी रुग्णालयात प्लाझ्मा दान केला आहे. सध्या विविध राज्यांमध्ये कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपीचा उपयोग केला जात आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्या प्लाझ्माचा वापर करीत रुग्णाच्या शरीरात प्रतिजैविक तयार करण्यात येत आहे.

झ्मा दान केल्यानंतर मिश्रा यांनी आनंद व्यक्त केला आहे. गंभीर रुग्णांना माझा प्लाझ्मा दिल्यात ते त्यातून बाहेर येऊ शकतात. त्यामुळे मी कोणाचा तरी जीव वाचवला याचा मला खूप आनंद होईल, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रानंतर इतरही राज्यांमध्ये प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग केला जात आहे. देशातल्या अन्य राज्यांपेक्षा सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. त्यामुळे सरकारची चिंतेत आहे. मृत्यूदर कमी कमी करण्यासाठी सरकारकडून आणखी उपायोजना केल्या जात आहेत. प्लाझ्मा थेरेपी कोरोनावर उपाय नाही. मात्रा, शेवटच्या स्टेजमध्ये असलेल्या रुग्णांना वाचविण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरिरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. त्याचा उपयोग कोरोनाविरुद्ध करण्यासाठी जी पद्धत आहे त्यालाच प्लाझ्मा थेरेपी म्हटले जाते.