पुणे जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील इंटरनेट सेवा बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

चाकण येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवरखबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील इंटरनेट सेवा खंडीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दौंड, भोर, बारामती, खेड, शिरुर, जुन्नर आणि मावळ या तालुक्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B00JE6HMNY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ba127a70-9b8c-11e8-9bd9-091d3198574f’]

३० जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात चाकण येथे दंगल झाली होती. त्यात ४ ते ५ हजार बेभान झालेल्या तरुणांनी रस्त्यावरील २० वाहने जाळली व ७० हून अधिक वाहनांची मोडतोड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी ५ हजार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर काल अपर पोलीस अधीक्षक यांनी चाकण येथे पोलीस पाटील, सरपंच यांची विशेष बैठक घेतली. त्यात बंदला प्रशासनाचे सहकार्य असेल. बंद शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

सपूंर्ण पुणे जिल्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह २२०० पोलीस कर्मचारी, ९०० होमगार्ड, ३ राज्य राखीव दलाच्या तुकड्या, २० ट्रायकिंग फोर्स, दंगल नियंत्रण पथकाचा बंदोबस्त नेमण्यात आला असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.