‘नवज्योत सिंग सिद्धू यांच्यापेक्षा मला…. कमी’ ; अर्चनांनी व्यक्त केली खंत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘द कपिल शर्मा’ शोमधून काही दिवसांपूर्वी नवज्योत सिंग सिद्धू यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर अर्चना पुरन सिंह यांनी परीक्षकाची धुरा सांभाळली. परंतु त्यांनी मानधनाला घेऊन आपली खंत व्यक्त केली आहे. आपल्याला मिळणारं मानधन हे सिद्धू यांच्या तुलनेत फारच कमी आहे असे दु:ख अर्चना यांनी व्यक्त केले आहे.

अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री मौनी रॉय हे आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शोमध्ये आले होते. यावेळी कपिलने मौनी आणि जॉन यांच्याशी संवाद साधला. सुपरपॉवर मिळाली तर काय व्हायला आवडेल ? असा प्रश्न कपिलने मौनीला विचारला. यानंतर मौनीने या प्रश्नाला उत्तर दिले. यानंतर परीक्षक अर्चना यांनी सिद्धू यांच्यासारखं होण्याची इच्छा व्यक्त केली.

अर्चना म्हणाल्या की, “मी देखील सिद्धूसारखंच काम करते. मात्र मला सिद्धूएवढं मानधन मिळत नाही. त्यामुळे आता मला नवज्योत सिंग सिद्धू व्हायचं आहे ज्यामुळे किमान मला सिद्धूएवढे मानधन तरी मिळेल.” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. हे सर्व त्यांनी जरी मस्करीत म्हटले असले तरी महिला कलाकरांना पुरुषांच्या तुलनेत कमी मानधन मिळते याकडे त्यांनी आपल्या विधानातून सर्वांचं लक्ष वेधलं.