‘द कपिल शर्मा शो’ फेम सुगंधा मिश्रा आणि कॉमेडियन संकेतने उरकला साखरपुडा

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  ‘द कपिल शर्मा शो’ फेम सुगंधा मिश्रा आणि कॉमेडियन संकेत भोसले यांनी नुकताच साखरपुडा उरकल्याचा खुलासा त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून केला आहे. सुगंधने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला ज्यात तिने ‘FOREVER’ असे कॅप्शन दिले. संकेतने देखील त्याच वेळी एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, “𝑭𝒐𝒖𝒏𝒅 𝑴𝒚 𝑺𝒖𝒏𝑺𝒉𝒊𝒏𝒆” म्हणजेच “मला माझा सूर्यप्रकाश सापडला.” संकेत संजय दत्त आणि सलमान खानच्या मिमिक्रीसाठी ओळखला जातो तर सुगंध हि एक अभिनेत्री आणि उत्तम गायक आहे जी लता दीदीं, आशा भोसले यांच्या आवाजात देखील गाते. संकेत आणि सुगंध दोघेही कपिलच्या शोचा भाग होते.

सुगंध मिश्रा आणि संकेत भोसले यांचे हे फोटोज तुम्ही बघितले का?