…म्हणून धर्मेंद्रंनी हेमामालिनीसाठी केलं होतं अख्खं हॉस्पीटल बूक

पोलिसनामा ऑनलाईन टीम – हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांचे लव्ह मॅरेज असून त्यांची प्रेमकथा सार्‍यांनाच माहिती आहे. त्यामुळे या प्रेमाखातर धर्मेंद्र यांनी हेमामालिनी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर संपूर्ण रुग्णालय बूक केले होते. चाहत्यांचा त्रास होऊ नये साठी धर्मेंद्र यांनी ही शक्कल लढविली होती.

हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांनी इशा देओल आणि आहाना देओल या दोन मुली आहेत. दोन्ही लेकींच्या जन्माच्यावेळी धर्मेंद्र यांनी हेमामालिनींसाठी संपूर्ण रुग्णालय बूक केले होते. हेमामालिनी रुग्णालयात असल्याची माहिती चाहत्यांना मिळाली असती तर त्यांनी रुग्णालयात गर्दी केली असती. त्यामुळे हेमामालिनींना त्रास झाला असता. म्हणूनच त्यांनी संपूर्ण रुग्णालय बूक करण्याचा निर्णय घेतला. यावरुनच धर्मेंद्र यांचं हेमामालिनींवर किती प्रेम आहे याचा प्रत्यय येतो.

दरम्यान, हेमामालिनी आणि धर्मेद्र यांच्याप्रमाणेच त्यांची लेक इशा देओलदेखील अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे अलिकडेच तिचं ‘अम्मा मिया’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून तिने पहिल्यांदाच लेखन क्षेत्रात पदार्पण केले आहे. याच पुस्तकाच्या प्रमोशनसाठी हेमामालिनी आणि इशाने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणून ‘द कपिल शर्मा शो’ आहे.

या शोमध्ये कपिल कलाकारांची कधीही न पाहिलेली बाजू प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. कलाकारांना विविध प्रश्न विचारुन त्यांच्या जीवनातील अनेक मजेदार गोष्टी तो त्यांच्याकडून जाणून घेतो. लवकरच या शोमध्ये अभिनेत्री हेमामालिनी या हजेरी लावणार आहेत. त्यापूर्वी त्यांचा सेटवरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात त्यांनी अभिनेता धर्मेंद्र यांच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला.