33 वर्षानंतर एवढे बदलले रामायणातील ‘सीता’ अन् ‘राम’, ‘कॉमेडी शो’मध्ये पाहूणे बनून आले

पोलीसनामा ऑनलाईन टीम : या शनिवार- रविवारी द कपिल शर्मा शोमध्ये खास पाहुणे येणार आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्व तयारी केली गेली आहे. या आठवड्यात रामानंद सागरची मालिका ‘रामायण’ स्टार अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये येणार आहेत.

रामानंद सागरची मालिका रामायण जानेवारी 1987 ते जुलै 1988 या काळात चालली. प्रेक्षकांनी याला मोठा प्रतिसाद दिला होता. नंतर बर्‍याच प्रॉडक्शन हाऊसनी रामायणवर मालिका बनवल्या पण रामानंद सागर यांच्या रामायण सारखे पुन्हा होऊ शकले नाही. त्यांनतर आता कपिल शर्माच्या शोमध्ये अरुण गोविल, दीपिका चिखलिया, सुनील लाहिरी आणि प्रेम सागर दिसणार आहेत. या सर्वांनी 26 फेब्रुवारी रोजी द कपिल शर्मा शोसाठी शूट केले होते. शोच्या जज अर्चना पूरन सिंग यांनी रामायणच्या स्टारकास्ट सोबत सोनी टीव्हीच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह व्हिडिओदेखील केला.

यावेळी, सर्व स्टारकास्टने रामायण बद्दल खूप काही बोलले, या पौराणिक कथा शो मध्ये काम केल्यानंतर त्यांचे जीवन कसे बदलले ते सांगितले. ते म्हणाले की, पडद्यावर देवाची भूमिका केल्यामुळे इतकी ख्याती मिळाली कि, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना दिल्लीत बोलावून त्यांचा सन्मान केला होता. एवढेच नव्हे तर रामायणातील कलाकार जेव्हा वाराणसीच्या घाटांवर अभिनय करत होते , तेव्हा लाखो लोक राम, लक्ष्मण आणि सीतेला पाहायला येत असे.

अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी यांना रामायणामुळे देशभरातून प्रसिद्धी मिळाली. याशिवाय दारा सिंह देखील या शोमध्ये होता. त्यांनी हनुमानाची भूमिका साकारली होती. दरम्यान, शनिवारी 7 मार्च रोजी आपल्याला टीव्हीवर रामायण मालिकेतील स्टारकास्ट पाहायला मिळणार आहेत.