The Kashmir Files | ‘द काश्मीर फाइल्स चित्रपट म्हणजे दहशतवाद्यांचा मोठा कट’, भाजपच्या मित्रपक्षाचा खळबळजनक दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्यावरुन वाद निर्माण झाला आहे. चित्रपटामध्ये काश्मिरी पंडितांना (Kashmiri Pandit) 1990 साली सहन कराव्या लागलेल्या यातनांना वाचा फोडण्यात आली आहे. परंतु त्यावरुन आता पुन्हा देशात धार्मिक तेढ (Religious Rifts) होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे चित्रपटाला काही भागात विरोध होत असला, तरी केंद्रातील सत्ताधारी भाजपकडून (BJP) ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपटाचं जोरदार समर्थन केलं जात आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील हा चित्रपट सर्वांनी पहावा, असे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रात भाजपसोबत सत्तेत असलेल्या एका मित्रपक्षाने (Alliance) मात्र खळबळजनक दावा (Claim) केला आहे. तसेच ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाशी संबंधित सर्वांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

 

केंद्रातील एनडीएमध्ये (NDA) मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे (Hindustani Awam Morcha) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री (Bihar Former CM) जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपटावर गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात ट्विट करत मांझी यांनी आपली भूमिका मांडली आहे.

 

‘द काश्मीर फाइल्स’ दहशतवादी कनेक्शन?
जीतन राम मांझी यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या टीमचे दहशतवाद्यांशी कनेक्शन (Terrorist Connection) असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
‘द काश्मीर फाइल्स’ दहशतवाद्यांचा एक मोठा कट असू शकतो.
जेणेकरुन हा चित्रपट पाहून काश्मिरी ब्राह्मणांमध्ये (Kashmiri Brahmins) भीती आणि दहशतीची भावना कायम ठेवण्यात दहशतवादी संघटना यशस्वी होती.
यामुळे काश्मिर पंडित कधीच काश्मिरला जाऊ शकणार नाहीत.
या चित्रपटाच्या युनिटच्या सर्व सदस्यांची दहशतवाद्यांशी कनेक्शन आहे किंवा नाही, याबाबत चौकशी व्हायला हवी,
असे जीतन राम मांझी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

Web Title :- The Kashmir Files | jitan ram manjhi bjp alliance claims terrorist links in the kashmir files movie

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPFO | प्रॉव्हिडेंट फंडात रू. 2.50 लाखोपक्षा जास्तीच्या योगदानावर आता लागणार टॅक्स, जाणून घ्या 10 महत्वाचे मुद्दे

 

CoronaVirus | चीन आणि काही यूरोपीय देशांत पुन्हा वेगाने वाढल्या कोरोना केस, केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र पाठवून दिले हे निर्देश

 

Reduce Risk Of Heart Attack | ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकचा धोका कमी करतील ‘ही’ 5 फळे, उन्हाळ्यात डाएटमध्ये करा समावेश

 

Diabetes Diet | ‘ही’ 2 हिरवी पाने डायबिटीजमध्ये शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी आहेत आश्चर्यकारक, होतात जबरदस्त फायदे