The Kashmir Files | ऑस्करसाठी ‘द काश्मीर फाइल्स’ची निवड; दिगदर्शक विवेक अग्निहोत्रीनी ट्विट करत दिली माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम : The Kashmir Files | 2022 या वर्षात सध्या बरेच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यापैकीच गाजलेला चित्रपट म्हणजे विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी यासारख्या दिग्गज कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या होत्या. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 340 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून ते आजपर्यंत अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा चित्रपट चर्चेत येण्यामागचे कारण मात्र अगदी कौतुकास्पद आहे. (The Kashmir Files)

 

आता ऑस्कर या सर्वोच्च पुरस्कारसाठी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची वर्णी लागली आहे. याआधी भारतातून RRR या चित्रपटाची निवड झाली होती. आता या यादीत ‘द काश्मीर फाइल्स’ ची देखील निवड करण्यात आली आहे. ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स’ ने ऑस्कर 2023 च्या सर्वोत्कृष्ट चित्रपट नामांकन विचारात घेण्यात आलेल्या जगभरातील 276 वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली यावेळी अकादमीने सांगितले की ही संख्या आता 301 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा देखील समावेश आहे. (The Kashmir Files)

‘द काश्मीर फाइल्स’ याबरोबरच भारतातून गंगूबाई काठियावाडी, कांतारा, इराविन निझाल,
RRR आणि द लास्ट फिल्म शो यांचा देखील समावेश आहे.
दिग्दर्शक राजामौली यांनी RRR हा चित्रपट ऑस्कर साठी नामांकित व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले होते
आणि शेवटी त्यांच्या या प्रयत्नांना फळ मिळाले. RRR हा चित्रपट देश-विदेशात चांगलाच गाजला होता.
आता या यादीत ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा देखील समाविष्ट झाल्यानंतर विवेक अग्निहोत्रीनी ट्विट करत
याची माहिती दिली. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला यंदाचा ऑस्कर मिळेल असा मोठा दावा देखील
विवेक अग्निहोत्री यांनी केली आहे.

 

Web Title :- The Kashmir Files | oscars 2023 the kashmir files kantara and gangubai are also eligible for nomination consideration

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षावर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, ‘न्यायव्यवस्थेला कोणी…’

Ajit Pawar | अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा; म्हणाले…

Pune Pimpri Crime | मला तू कॉलेजपासून आवडते म्हणत महिलेसोबत गैरवर्तन, आरोपी गजाआड; तळेगाव दाभाडे येथील घटना