The Kashmir Files चित्रपट पाहून परतणाऱ्या BJP खासदारावर बॉम्ब हल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपट वादविवाद सुरु असताना भाजपने चित्रपटाचे समर्थन करुन सर्वांनी चित्रपट पहावा असे आवाहन केले होते. ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर (Kashmiri Pandits) झालेल्या अत्याचारावर आधारीत आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. तर दुसरीकडे या चित्रपटावरून चांगलाच गदारोळ माजला आहे. समर्थनार्थ आणि विरोधात अनेकजण सोशल मीडियावर (Social Media) भिडत आहेत. आता तर चक्क खासदारावर (MP) हल्ला करण्यात आला आहे.

 

 

पश्चिम बंगालच्या राणाघाट (Ranaghat in West Bengal) येथून भाजपचे खासदार जगन्नाथ सरकार (BJP MP Jagannath Sarkar) यांच्या गाडीवर बॉम्ब हल्ला (Bomb Attack) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात त्यांची कार जळाली, सुदैवाने ते बचावले. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. नदिया जिल्ह्यात (Nadia District) ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपट पाहण्यासाठी खासदार जगन्नाथ गेले होते. चित्रपट पाहून परत येत असताना त्यांच्या कारवर हा बॉम्ब हल्ला करण्यात आला. गाडी वेगाने असल्यामुळे गाडीच्या पाठिमागे हा बॉम्ब पडला. म्हणून ते सुदैवाने बचावले असे सांगण्यात येत आहे.

या घटनेनंतर खासदार सरकार यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात राज्याची परिस्थिती दयनीय बनली आहे.
राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण होत
असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी खासदार सरकार यांनी केली आहे.
राज्य सरकारने लोकशाहीला पायदुळी तुडवलं असून राज्यात कोणीही सुरक्षित नाही.
म्हणूनच राज्यात 356 अन्वये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी जगन्नथ सरकार यांनी केली आहे.

 

Web Title :- The Kashmir Files | the kashmir files bomb attack on bjp mp returning from the kashmir files in west bengal mp jagannath sarkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | ‘द कश्मीर फाइल्स’मधील अनेक घटना खोट्या, संजय राऊतांचे मोठं विधान

 

Jaggery During Pregnancy | प्रेग्नंसी दरम्यान केले गुळाचे सेवन तर होतील ‘हे’ 5 फायदे

 

Diesel Price Hike | घाऊक खरेदीदारांसाठी महागले डिझेल, 25 रुपये लीटरने वाढले दर