The Kerala Story News | ‘द केरला स्टोरी’च्या शो वरून पुण्यातील एफटीआयआय मध्ये तुफान राडा; निर्माता व दिग्दर्शकही उपस्थित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – The Kerala Story News | ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सतत वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसतोय. या चित्रपटाला समर्थन करणारा एक गट तर विरोध करणारा एक गट यांच्यामध्ये वैचारिक व्दंव्द तर सुरुच आहे. आता मात्र हा वाद विकोपाला गेला असून, पुण्यामध्ये (Pune) एफटीआयआय मध्ये या चित्रपटावरुन चांगलाच राडा झाला आहे. एफटीआयआय Film and Television Institute of India (FTII) ही एक पुण्यातील नामांकित अभिनयाचे (Acting) शिक्षण देणारी संस्था आहे. (The Kerala Story)

याच एफटीआयआय संस्थेतील मेन थिएटरमध्ये पुण्यातील ‘मीती’ (MITI) या संस्थेच्या माध्यमातून ‘द केरला स्टोरीज’च्या शोच आयोजन करण्यात आल होतं. मात्र, यावेळी संस्थेतील काही विद्यार्थ्यांनी या शो ला जोरदार विरोध केला. विद्यार्थ्यांनी हा चित्रपट प्रचारू चित्रपट असल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली व शो बंद करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या शो ला ‘द केरला स्टोरीज’ चित्रपटाचे निर्माता (Producer), आणि दिग्दर्शक (Director) ही उपस्थित होते. विद्यार्थ्यांकडून झालेल्या विरोधामुळे मोठ्या पोलीस बंदोबस्तात (Pune Police) हा शो पार पडला.

एफटीआययमध्ये आधीपासूनच एका विद्यार्थ्याच्या निलंबनावरून विद्यार्थी आंदोलन सुरु आहे.
त्यामध्येच विद्यार्थी संघटनांनी ‘द केरळ स्टोरी’च्या शोलाही विरोध केला, त्यामुळे एफटीआयआयमधील वातावरण चांगलेच तापले आहे.

बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणाऱ्या द केरला स्टोरीला अनेकांकडून विरोध केला जात आहे.
काहींचा चित्रपटातील खोट्या कहानीवर तर काहींचा हिंदू मुस्लिम ऐक्य घालवणारा हा चित्रपट असल्याने विरोध
सुरू आहे. या चित्रपटावरून वाद चिघळत चालले असून, याचा परिणाम आता शिक्षण संस्थांमध्येही दिसू लागला आहे.

Web Title : The Kerala Story News | ‘The Kerala Story’ show storms at FTII in Pune; Producer and director are also present

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘ज्यांच्याकडे पांढार पैसा असेल त्यांना…’, नोटबंदीवर फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं (व्हिडिओ)

ACB Trap News | 20 हजाराच्या लाच प्रकरणी कोपरगावच्या तहसीलदारासह खाजगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात