मैत्रिणीच्या ‘इंस्टाग्राम’चा वापर करून अपहरण, पुढे झाले असे की तुम्ही वाचून व्हाल थक्‍क

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ कारणावरून मैत्रिणीच्या ‘इंस्टाग्राम’वरून भेटायला बोलावून, मारहाण करुन, गळ्यातील सोनसाखळी काढून जबरदस्तीने दुचाकीवरून कॉलेजच्या तरुणाचे अपहरण केले. मात्र नाकाबंदी करत असलेल्या देहूरोड पोलिसांना अपहरण झालेल्या तरुणाची सुटका केली. ताब्यात घेतलेल्या दोघांकडून एक पिस्तुल जप्त केले आहे. हा प्रकार बुधवारी रात्री नऊ ते दहा दरम्यान हिंजवडी फेज तीन ते देहूरोड दरम्यान घडला. या प्रकरणात पाच सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सूरज संजय कोळी (२२, रा. आकुर्डी, मूळ-सोलापुर) याचे अपहरण व सुटका झाली असून त्याने फिर्याद दिली आहे. आदित्य कोडगी, गणेश पूरी, वैभव उपाडे, हृतिक जाधव, शुभम वाळके, बाळा लोखंडे, सुप्रिया आव्हाड आणि इतर चार पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज हा शिक्षण घेत आहे. गणेश पूरी याचे आणि माझे जमत नसल्याचे सूरज मोन्या कदम याच्या जवळ बोलला होता. हे मोन्याने गणेश ला सांगितले. यामुळे गणेश याने सूरजची मैत्रीण सुप्रिया हिच्या इंस्ट्राग्राम वरूण टिनसेल टाऊन सोसायटी इथे भेटायला बोलावले. सूरज सुप्रियाला भेटण्याच्या हेतूने तिथे आला असता त्याच्या आर १५ गाडिला धडक देऊन खाली पाडले. मारहाण करुन गळ्यातील साडे तिन तोल्याची सोनसाखळी काढून घेतली. त्याला गाडीवर बसवून घेऊन गेले.

देहुरोड पोलिस नाकाबंदी करत असताना पोलिस उपनिरीक्षक मनोज पवार यांना संशय आल्याने तपासणीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी गणेश याच्याकडे पिस्टल आढळले. अधिक चौकशी केली असता सूरजचे अपहरण केल्याचे समोर आले. त्यामुळे गणेश पूरी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. गुन्हे शाखा आणि हिंजवडी पोलिसांनी इतर पाच सहा जनाणा ताब्यात घेतले आहे. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.