सर्वात मोठ्या चाकण पोलिस ठाण्याचे तीन भागात विभाजन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयचा निम्मा भाग असणारे आणि महाराष्ट्रात ग्रामीण परिसरात सर्वात मोठे पोलिस ठाणे असणाऱ्या चाकण पोलिस ठाण्याचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी तीन भागात विभाजन केले आहे. यामुळे लॉबिंग, प्रेशर आणि पोलिस ठाणे मिळावे यासाठी देव पाण्यात ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. तर नव्याने सुरु करण्यात आलेल्या म्हाळुंगे, शिरगाव, रावेत पोलिस चौकीचे उदघाटन मगंळवारी करण्यात आले.

हिंजवडी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या बावधन, देहूरोड पोलिस ठाण्यांतर्गत असलेला रावेत परिसर आणि चाकण पोलिस ठाण्यांतर्गतच्या म्हाळुंगे पट्ट्यासाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची निर्मिती करतानाच बावधन साठी स्वतंत्र पोलिस ठाण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्यानुसार या चौक्या सुरु करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी वरिष्ठ निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी स्वतंत्र देण्यात आले आहेत.

बावधन परिसरात राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या कंपन्या आहेत. त्याच बरोबर अनेक सनदी अधिकारी या भागात राहतात. उच्चभ्रू लोकवस्ती या भागात असून, पुणे-बंगलोर हायवेला लागून असलेल्या या भागात लूटमार आणि चोऱ्यांचे प्रकार घडत असतात. हिंजवडी पोलिस ठाण्यांतर्गत असलेला हा परिसर पुणे आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्राच्या सीमेवर आहे. हिंजवडी पोलिस ठाण्यापासून सुमारे ५ किलोमीटर दूर असलेल्या या भागात एक पोलिस चौकी आहे. परंतू, तेथे मदत तत्काळ पोहचण्यास अथवा निरीक्षक किंवा तत्सम अधिकाऱ्यांना पोहचण्यास वेळ लागलो. हा परिसर पूर्वी पौड पोलिस ठाण्यांतर्गत येत होता.

कालांतराने तो हिंजवडी पोलिस ठाण्याला जोडण्यात आला आहे. आय. टी. पार्क हिंजवडी आणि ग्रामपंचायत तसेच इतर गावांमुळे बावधनकडे लक्ष देण्यास पोलिसांना मर्यादा येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या चौकीचे लवकरच उदघाटन होणार आहे. पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वात ‘मलाई’दार आणि मोठे पोलिस ठाणे म्हणून चाकणची ख्याती आहे. यापूर्वी या ठिकाणी अनेक दिग्गज पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व ताकद पणाला लावून पोस्टिंग मिळवलेली आहे. ७१ गावे, राष्ट्रीय महामार्ग आणि औद्योगिक क्षेत्र असणाऱ्या या चाकण पोलिस ठाण्याचे पोलिस आयुक्तांनी विभाजन केले. अनेकांच्या स्वप्नावर पाणीच फिरले.

चाकण पोलिस ठाणे मिळावे यासाठी अनेक अधिकारी रेस मध्ये होते. मात्र पोलिस आयुक्तांनी एकाच पोलिस ठाण्याचे तीन ठिकाणी विभाजन केल्याने सगळेच थंडावले. नवीन विभाजननुसार चाकण पोलिस ठाण्याअंतर्गत म्हाळुंगे आणि पाइट पोलिस चौकी असे विभाजन केले आहे. यामध्ये चाकणच्या अंतर्गत १८ गावे, म्हाळुंगे चौकीच्या अंतर्गत २१ गावे आणि औद्योगिक क्षेत्र तर पाइट चौकीच्या अंतर्गत ३२गावे असे विभाजन झाले आहे.

 

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पुण्यातील रुग्णालये आणि कॉलेजमध्ये बेकायदा पार्किंग बंद करा – रिपाइं

मुख्यमंत्र्यांची आमदारकी धोक्यात ? २३ जुलै ला फैसला !

पावसाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी आहारामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like