नव मतदारांना यादीत नाव नोंदण्याची अखेरची संधी

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन

निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून त्या कालावधीमध्ये यादीतील नाव, हरकती व नूतन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपुर्वी नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी तसेच नवीन मतदारांना नोंदणी करण्याची ही अखेरची संधी आहे.
[amazon_link asins=’B07B6SN496′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8208b48b-ab72-11e8-a953-a5fec7c6de33′]

साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल व उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता यांनी पत्रकार परिषदेत मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला. १ सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. ही यादी सर्व तहसिल कार्यालयात पाहता येईल. १ सप्टेंबर ते ३१ ऑक्‍टोंबर कालावधीत मतदारांना हरकती दाखल करता येणार आहेत. ३० नोव्हेंबर रोजी हरकती निकालात काढण्यात येणार असून अंतिम यादी ४ जानेवारी २०१९ रोजी प्रसिध्द होणार आहे. या कालावधीत ज्या मतदारांचे यादीत नाव नाही त्यांना तसेच १ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्ष पूर्ण होणार आहे त्या युवा मतदारांना दरम्यानच्या कालावधीमध्ये नाव नोंदणी करता येणार आहे.

गणेशोत्सवाची सुरुवात करण्यावरुन पुण्यात वाद पेटणार 

नोंदणी तहसिल व प्रांत कार्यालयात समक्ष अथवा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने देखील करता येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केल्यास बीएलओ हा आपल्या पत्त्यावर भेट देवून कागदपत्रांची पाहणी करेल. तसेच या कार्यक्रमामध्ये दिव्यांग, महिला व तृतीयपंथीय मतदारांची नोंदणी करण्यावर भर दिला जाणार आहे. मतदारांची संख्या वाढावी यासाठी राजकीय पक्षांसोबत प्रशासन समन्वय साधत असून पक्षांनी ही पुढाकार घेवून मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’93bb57c5-ab72-11e8-9541-c392f239aa0c’]

लोकसभा व विधानसभा एकत्र घेण्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून आपणाला तयार राहण्याच्या कोणत्याही सूचना आल्या नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तर येत्या काळात निवडणूका झाल्या तर प्रशासन तयार आहे का या प्रश्‍नावर आम्ही सदैव तयारच असतो असे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

पुण्याचा धडाकेबाज फलंदाज पवन शहा १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like