हैदराबादचे अखेरचे निजाम मीर उस्मान अली खान यांच्या शेवटच्या वंशजाचं निधन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबादच्या सातव्या आणि शेवटच्या निजाम मीर उस्मान अली खानचे शेवटचे वंशज बशीरुन्निसा बेगम यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. बशीरुन्निसा ही शेवटच्या निजामाची शेवटची मुलगी होती. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला

सातव्या आणि शेवटच्या निजामाच्या 16 मुलींपैकी सहाबजदी बशीरुन्निसा हैदराबादच्या पुरानी हवेली येथे आपली मुलगी रशीदुन्निसाबरोबर राहत होती. पुरानी हवेली निजामाच्या हवेलींपैकी एक आहे. बशीरुन्निसा यांचे पती नवाब काजिम यार जंग होते, त्यांना ‘अली पाशा’ म्हणून ओळखले जात असे. 1998 मध्ये त्यांचे निधन झाले

बशीरुन्निसा यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे त्याचे अंत्यसंस्कार शाही पद्धतीने केले गेले नाहीत. कोरोना व्हायरस मार्गदर्शक तत्त्वांमुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार सोप्या पद्धतीने करण्यात आले. त्याचा मृतदेह अहिया पाशाच्या दर्ग्यात पुरला आहे.