‘आत्मनिर्भर’ भारत संकल्पनेला आव्हान ठरणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांना कायदा सक्त असावा

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक संसाधने असल्याने सर्वनियम कायदे धाब्यावर बसवून देशातील छोट्या व्यापाऱ्यांना देशोधडीला लावले जात आहे. किरकोळ व्यापारात आपली एकाधिकारशाही बनवीणाऱ्यां ई-कॉमर्स कंपन्या विरोधात अनेक तक्रारी केंद्र शासनाकडे किरकोळ व्यापाऱ्यांचे प्रतीनीधित्व करणाऱ्या कॉनफेडरेशन आॕफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) यांनी केल्यावरही प्रभावशाली कायदे नसल्याने भारतातील किरकोळ व्यापार उद्धस्त होण्याचे मार्गावर आहे. केंद्र शासनाने या कंपन्यांना लगाम लावावा असे निवेदन जिल्हाधिकारी यांचे मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे वतीने पाठविण्यात आले आहे.

या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी देशाच्या अनेक कायद्यात पळवाटा शोधून किरकोळ व्यापार ताब्यात घेतला आहे. कोणता ही प्रभावशाली कायदाच अस्तीत्वात नसल्याने केंद्र शासनाच्या लोकल फॉर व्होकल व आत्मनिर्भर भारत संकल्पनेलाच आव्हान दिलेले आहे व देशातील किरकोळ व्यापार उद्धस्त होत आहे. अशा ई-कॉमर्स कंपन्यांना कायद्याच्या कक्षेत आणून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कडक व ठोस कार्यवाही करावी. तसेच या करता सशक्त रेग्युलेटरी अथॉरिटीच्या स्पष्ट निर्देशासह एक सशक्त ई-कॉमर्स कंपनीची घोषणा करण्यात यावी अशी मागणी कॅटने केलेली आहे.

अश्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांना जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय मंत्री ,उपाध्यक्ष संजय मोदानी, कार्यकारिणी सदस्य धनंजय जेवळीकर, किराणा असोसिएशनचे चंदु गार्डे, लक्ष्मीकांत तडवळकर, अमोल देवगुडे, अमित भराटे उपस्थित होते.