न्यायाधीशाच्या फेसबुक पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करणं वकिलाला भोवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

न्यायाधीशांच्या फेसबुकवरील पोस्टला लाईक करुन प्रतिक्रिया व्यक्त करण एका वकिलाला चांगलच भोवले. पुणे जिल्हा न्यायालयातील एका न्यायाधीशाच्या पोस्टला वकिलाने लाइक केल्याने या वकिलाचा खटला दुसऱ्या कोर्टात वर्ग करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
[amazon_link asins=’B07CKPLGDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’39f77a23-8b4e-11e8-90d2-45d3e94dda5d’]

ज्या न्यायाधीशाच्या कोर्टात खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्या न्यायालयाच्या फेसबुक पोस्टला लाइक करून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणं ही व्यवसायाशी केलेली प्रतारणा आहे. त्यामुळे मुख्य न्यायाधीशांनी हा खटला दुसऱ्या कोर्टात वर्ग केला हे योग्यच केलं, असं खंडपीठानं म्हटलं आहे.

पुणे जिल्हा न्यायालयात जमिनीच्या वादासंदर्भातला एक खटला सुरू होता. एप्रिल २०१८मध्ये याचिकाकर्त्याच्या कुटुंबातील वकिलाने सुनावणी सुरू असताना न्यायाधीशाच्या एका फेसबुक पोस्टला लाइक करून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांनी हे प्रकरण मुख्य न्यायाधीशांच्या समोर ठेवलं होतं. त्यामुळे मुख्य न्यायाधीशांनी हा खटला दुसऱ्या न्यायालयात वर्ग केला.
[amazon_link asins=’B07DYFX2C8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3effedc0-8b4e-11e8-b16a-599b2d73da94′]

दरम्यान, या कुटुंबाने न्यायाधीशांच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या खटल्यातून वगळण्यात आलेल्या न्यायाधीशांसमोरच या खटल्याची सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. त्यावर खंडपीठाने हा निर्णय दिला.