‘या’ नेत्याला देखील शरद पवार यांच्या प्रमाणे वजन कमी करायचेय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवत १४ किलो वजन कमी केले आहे. शरद पवार यांच्या सारखेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना आपले वजन कमी करायचे आहे. सध्या खूप दगदग आहे. आयपीएल मॅचप्रमाणे कमी वेळेत जास्त धावा काढायच्या आहेत.

याचा परिणाम प्रकृतीवर होतो. त्यामुळे मलाही आरोग्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. मलाही पवारसाहेबांप्रमाणे वजन घटवायची इच्छा असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अशोक चव्हण बोलत होते.अशोक चव्हण यांना आरोग्य आणि फिटनेसबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले कि, मला दगदग खूप आहे, मला प्रवास खूप आहे, जबाबदारी जास्त आहे. भेटणाऱ्या लोकांची संख्याही जास्त आहे, ताण प्रचंड आहे. या सर्व बाबींचा प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे मलाही आरोग्याकडे लक्ष द्यायची गरज आहे.

मलाही पवारसाहेबांप्रमाणे वजन घटवायची इच्छा आहे. आयपीएल मॅचप्रमाणे कमी वेळेत जास्त धावा काढायच्या, तसंच माझं काम आहे. वेळ कमी असून कामाचा व्याप जास्त आहे. तरीही, प्रकृतीची काळजी घ्यावीच लागणार आहे
मनसेला विरोध महाआघाडी ही मूलभूत विचारसरणीच्या आधारावरच उभी राहिली आहे. महाआघाडीच्या नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आघाडीत घ्या, असे कुणी म्हटले तर ते शक्य आहे काय, असा सवाल करीत राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत घेण्यास माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट विरोध केला.