‘युरोपीय देशाचाही अर्थसंकल्प लाजेल एवढा प्रचंड घोटाळा राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यांनी केला’ : भाजपाचा घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सिंचन घोटाळा म्हणजे महाराष्ट्राच्या सिंचन विभागात २००० च्या दशकात झालेला आक्राळविक्राळ महाभयंकर घोटाळा आहे. एका युरोपीय देशाचा अर्थसंकल्प पण या आकड्यापुढे लाजेल एवढा प्रचंड घोटाळा या थोर चोर नेत्यांनी केला. असा घणाघात भाजपने सिंचन घोटाळ्यावरून केला आहे. या घोटाळ्यावरून भाजपाने राष्ट्रवादीचे नेते  अजित पवार आणि सुनिल तटकरे यांनी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपा महाराष्ट्र या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत भाजपाने राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

दरम्यान आपल्या ट्विटमध्ये भाजपाने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनिल तटकरे यांना टॅग करत म्हटले आहे की, “सिंचन घोटाळा म्हणजे महाराष्ट्राच्या सिंचन विभागात २००० च्या दशकात झालेला आक्राळविक्राळ महाभयंकर घोटाळा आहे. एका युरोपीय देशाचा अर्थसंकल्प पण या आकड्यापुढे लाजेल एवढा प्रचंड घोटाळा या थोर चोर नेत्यांनी केला आहे.” असा घणाघात भाजपाने केला आहे.

https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1113667618647498752

भाजपा याशिवाय या ट्विटमध्ये भाजपाने अजित पवार आणि सुनिल तटकरे यांचा  फोटो आणि धरणाचा एकत्र फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोत काही मजकूर लिहिला आहे, त्यात भाजपाने म्हटले आहे की, “सिंचन घोटाळा हा एक आक्राळविक्राळ आणि महाभयंकर घोटाळा आहे. विदर्भातील 38 सिंचन प्रकल्पाची किंमत 6672 कोटी रुपयांवरून थेट 26722 कोटी रुपये इतकी दाखवण्यात आली आहे. या आणि अशा विविध प्रकल्पाच्या किंमती वाढवून जवळजवळ 72 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे.” हा फोटो ट्विट करताना भाजपाने @NCPspeaks, @AjitPawarSpeaks आणि @SunilTatkare या ट्विटर अकाऊंटला टॅगही केले आहे. शिवाय #विसरला_नाही_महाराष्ट्र, #आघाडी_बिघाडी असे हॅशटॅगही वापरले आहेत.